आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हैद्राबादच्या शार्प शूटर्सकडून नरभक्षक बिबट्या ठार; अाेळख पटताच मारल्या गाेळ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव- पाच महिन्यांपासून वनविभागास गुंगारा देणाऱ्या नरभक्षक बिबट्यास शनिवारी रात्री १०.१५ वाजता ठार करण्यात अाले. सात जणांचे बळी घेणाऱ्या बिबट्यास वरखेडे गावात हैद्राबादहून अालेल्या शार्प शूटर्स नवाब शफहात अलीखान यांच्या टीमने ठार केले. 


गेल्या पाच महिन्यांत चाळीसगाव परिसरातील जणांचे बळी या बिबट्याने घेतले हाेते. बिबट्याच्या शाेधासाठी १० टीम तयार केल्या हाेत्या. वनविभागाने १० हजार एकर क्षेत्रात १० मानवी मनाेरे उभारले हाेते. त्यानंतरही बिबट्या सापडत नव्हता. १० टीममध्ये हैद्राबादचे नवाब शफहात त्यांचा मुलगा अजगरअली खान, अाैरंगाबादचे डाॅ.साद नक्षबंदी, डाॅ.शाैद नक्षबंदी यांचे पथक हाेते. शनिवारी वरखेडे खुर्द गावात रस्त्याच्या कडेला चार ते पाच लाेक जात हाेते. त्या वेळी झुडपांमध्ये हा बिबट्या दिसला. त्याच्या मागावर हे चार जणांचे पथक हाेते. या पथकाने त्याचे निरक्षण सुरू केले. त्याला ठार करण्यापूर्वी ताे नरभक्षक अाहे का? हे शाेधण्यासाठी काही वेळ वाट पाहिली. रस्त्याने चालणाऱ्या लाेकांवर हल्ला करणार हाेता, ताेच त्याला गाेळी घालून ठार करण्यात अाले. काही दिवसांपूर्वी ट्रॅप कॅमेऱ्यात अालेला हाच बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले अाहे.


बिबट्यास सहाव्या हल्ल्याजवळ टिपले 
बिबट्याज्या ठिकाणी ठार झाला त्या जागेपासून शंभर मीटर अंतरावर २६ नाेव्हेंबर राेजी यमुनाबाई तिरमली यांना बिबट्याने ठार केले हाेते. त्याच जागेजवळ त्याला टिपण्यात अाले. बिबट्या वर्षीय मादी नरभक्षक असलेला बिबट्या हा चार वर्षांचा असून, मादी अाहे, असे शार्प शूटर्स नवाब शफहात अलीखान यांनी सांगितले. 


तीन दिनसे साेया नही,अाज चेन की नींद लुंगा 
शनिवारी बिबट्याचा शाेध सुरू हाेता. २६ नाेव्हेंबरला ज्या ठिकाणी महिलेला ठार केले, त्याच्याजवळ अाम्ही रात्री हाेताे. त्यावेळी रस्त्याने चालताना बिबट्या दिसला. मला पाहून ताे शेतात घुसला. त्यानंतर पुन्हा शेतातून बाहेर येत चालू लागला. त्याच्या काही अंतरावर पाच व्यक्ती चालत हाेत्या. बिबट्याला ठार मारण्यापूर्वी नरभक्षक हाच बिबट्या अाहे का? याची तपासणी मला करायची हाेती. त्यामुळे जवळपास दहा सेकंद मी त्याच्या हालचाली टिपल्या. ताे नरभक्षक असल्याचे स्पष्ट हाेताच त्याला गाेळ्या घातल्या. दाेन सेकंद मी उशीर केला असता तर त्याने एखाद्यावर हल्ला केला असता. बिबट्याच्या शाेधामुळे तीन दिवसांपासून झाेपलाे नव्हताे. अाज ‘चेन की निंद साेऊंगा.’ 

 

बिबट्याकडून पाच महिन्यांत सात बळी 
जुलै राहुल चव्हाण (वय ८) 
११ सप्टेंबर अलका अहिरे (वय ५०) 
११ नाेव्हें. बाळू साेनवणे (वय १२) 
१५ नाेव्हें. दीपाली जगताप (वय २५) 
२६ नाेव्हें. सुसाबाई भील (वय ५५) 
२८ नाेव्हें. यमुनाबाई तिरमली (वय ७०) 
डिसेंबर कुणाल अहिरे (वय ७) 

बातम्या आणखी आहेत...