आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवीन उपसा केंद्रासाठी जायकवाडीच्या पायथ्याशी चार एकर जागा मंजूर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समांतर जलवाहिनीसाठी जायकवाडी येथे नवीन उपसा केंद्र उभारण्यासाठी जागा मिळावी, अशी विनंती मनपाने वन विभागाकडे केली होती. ही जागा देण्यावर बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिक्कामोर्तब केले. जायकवाडी धरणाच्या पायथ्याशी ही जागा आहे. ही जागा मंजूर करण्यात आली असल्याचे आयुक्त दीपक मुगळीकर यांनी सांगितले. 


दोन वर्षांपूर्वी मनपाने औरंगाबाद युटिलिटी कंपनीमार्फत समांतर जलवाहिनीचे काम सुरू केले. मनपाच्या सध्याच्या पाणी उपसा केंद्राच्या बाजूलाच वन विभागाची चार एकर जागा आहे. समांतर जलवाहिनीचे जल उपसा केंद्र उभारण्यासाठी, ही जागा मिळावी असा प्रस्ताव मनपाने शासनाकडे पाठवला होता. 

बातम्या आणखी आहेत...