आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

55 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; आतापर्यंत 102 कोटी रुपयांची झाली कर्जमाफी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार ३६० शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. यात १०० टक्के थकबाकीदार असणाऱ्या २३ हजार शेतकऱ्यांना तर प्रोत्साहनपर योजनेतील ३२ हजार ३६० शेतकऱ्यांना समावेश आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर कल्याणकर यांनी दिली. 


शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास उशीर होत असल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने टीका करण्यात येत आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर कर्जमाफीचा प्रश्न तातडीने निकाली निघावा, यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँका शनिवारी आणि रविवारीही सुरू ठेवण्यात आल्या होत्या. 


२३ हजार शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी
कल्याणकर यांनी सांगितले की, औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे लाख हजार ३१५ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहेत. ही रक्कम साधारण ४०७ कोटी इतकी आहे. कर्जमाफीचा लाभ दीड लाखाच्या आतील थकबाकीदार शेतकरी आणि नियमित फेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर योजना अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येत आहे. २३ हजार शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. १०० टक्के लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांची रक्कम ४८ कोटी आहे. दरम्यान, हे आकडे केवळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आहेत. 

बातम्या आणखी आहेत...