आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील 82 हजार 462 शेतकऱ्यांना कर्जमाफी; 333 कोटी 75 लाखांची रक्कम खात्यावर जमा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ८२ हजार ४६२ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून ३३३ कोटी ७५ लाख रुपयांची ही कर्जमाफी आहे. यात ४८ हजार १६१ शेतकऱ्यांना २८३ कोटी ९६ लाखांची शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे, तर ३४३०१ शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. विशेष म्हणजे ही दहा बँकांच्या माध्यमातून मिळालेली कर्जमाफी आहे. इतर बँकांचे आकडे अजून समोर यायचे आहेत. 


नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच कर्जमाफीची गती वाढली आहे. गेल्या आठवड्यात शनिवार आणि रविवारीदेखील जिल्हा मध्यवर्ती बँकांसह इतर बँका सुरू ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा चांगला परिणाम पाहावयास मिळत आहे. 


जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५३,२१९ लाभार्थींना ९९ कोटी ६३ लाख रुपयांचा लाभ मिळालेला आहे. यामध्ये २०१९८ शेतकऱ्यांना ५३ कोटी ८३ लाखांची संपूर्ण कर्जमाफी, तर ३३ हजार २१ शेतकऱ्यांना ४६ कोटींची प्रोत्साहनपर कर्जमाफी मिळाली आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेमार्फत औरंगाबाद जिल्ह्यात ८०६३ शेतकऱ्यांना ८९ कोटी ६१ लाखांची शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. बँक ऑफ बडोदाच्या १७०० लाभार्थींसाठी कोटी ९४ लाख रुपये, प्रोत्साहनपर पात्र ९६४ शेतकऱ्यांना कोटी ९१ लाख रुपये, तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ७३०५ लाभार्थींसाठी ५४ कोटी ७६ लाख रुपये आणि बँक ऑफ महाराष्ट्रच्या ७७७५ शेतकरी लाभार्थींना ५४ कोटी ७६ लाख रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. 


सेंट्रलबँक ऑफ इंडियाची १६ कोटींची रक्कम जमा
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने २३४२ शेतकऱ्यांना १६ कोटी १८ लाख रुपयांची शंभर टक्के कर्जमाफी मिळाली आहे. ८४ जणांना १३ लाख ३० हजार रुपये प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला आहे. अलाहाबाद बँकेच्या ४८१ शेतकऱ्यांना कोटी ८४ लाख, आयसीआयसीआयच्या ३५ शेतकऱ्यांना ३९ लाख ९७ हजार, तर युनियन बँक ऑफ इंडियाच्या २६० शेतकऱ्यांना कोटी ६२ लाखांची कर्जमाफी मिळाली आहे. 


अधिवेशनामुळे वाढली बँकेची गती 
अधिवेशनात कर्जमाफीचा मुद्दा गाजणार आहे. त्यामुळे बँक आणि सहकार खाते युद्धपातळीवर कामाला लागला असून, कर्जमाफीच्या आकड्यात दररोज वाढ होताना दिसत आहे. एकट्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून साधारण ४०७ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. सध्याची कर्जमाफी पाहता जिल्हा बँकेची २५ टक्के कर्जमाफीची रक्कम बँकेकडे जमा झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...