आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेयसीच नव्हे, आईवडील, भाऊ, बहिणीवरही प्रेम करा : दानवे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- भारतीय संस्कृतीत आई-वडिलांच्या चरणातच खरा स्वर्ग आहे. कोणतीही राज्यसत्ता, पैसा, पद आई-वडिलांहून मोठे नाही. मात्र, आज लाखभर पैसे कमावणारेही वृद्ध आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात. वृद्धाश्रम हे आपल्या संस्कृतीसाठी कलंक आहे. तो पुसण्यासाठी व्हॅलेंटाइन डे सारखी निमित्त शोधून प्रेयसीवर प्रेम व्यक्त करण्यापेक्षा दररोज आई-वडिलांवर प्रेम करण्याचा सल्ला, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी दिला. 


शिवसेनेच्या वतीने मंगळवारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पहिल्यांदाच ३०९ माता-पित्यांचे पूजन करण्यात आले. या वेळी महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगावकर, माजी खासदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, विकास जैन, माजी महापौर कला ओझा, सुनीता आऊलवार, राजू वैद्य, गोपाळ कुलकर्णी, रामभाऊ सारडा महाराज, आंधळे महाराज आदींची उपस्थिती होेती. दानवे म्हणाले, भारतीय संस्कृतीत प्रेम करण्यासाठी एका दिवसाची गरज नाही. आईच्या हट्टासाठी राज्याला लाथ मारण्याची आपली संस्कृती आहे. तर आई-वडिलांसाठी कावड यात्रा काढणारा श्रावणबाळही आपल्याला माहिती आहे. आई जिजाऊच्या शिकवणीमुळेच छत्रपती शिवाजी महाराज घडले. आपण दसरा, दिवाळी, रंगपंचमी, संक्रांत अशा प्रत्येक सणाला प्रेमाचा संदेश देतो. कोणा परदेशी व्हॅलेंटाइनने आपल्याला प्रेमाचे महत्त्व सांगण्याची गरज नाही, असे मत दानवे यांनी व्यक्त केले. 


महापौर घोडेले म्हणाले, जगात सर्व काही विकत घेता येते, पण आई-वडिलांचे प्रेम कसे विकत घेणार? स्वत:च्या पोटाला चिमटा काढून आई-वडील मुलांचे पोट भरतात. आई-वडिलांचे महत्त्व कळाले तरच वृद्धाश्रम बंद होतील. जैस्वाल म्हणाले, लाखभर पगार घेणारेही आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवतात, हे चुकीचे आहे. सारडा महाराजांनी पुत्र धर्माप्रमाणेच पितृ धर्माचे महत्त्व सांगितले. पिता जर चुकीच्या मार्गावर जाणार असेल तर त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचे काम मुलाचे असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी अनेक मुलांनी आई-वडिलांच्या गळ्यात हार घालून त्यांचे औक्षण केले. तर दानवे यांनी प्रत्येकांना भगवी शाल देऊन त्यांचा चरणस्पर्श केला. स्वामी समर्थ केंद्राचे मयूर कोलतेंनी मंत्रोच्चार केला. तर संदीप कळंबकर यांनी सूत्रसंचालन केले. 


३४२ रुपयांत ४ लाखांची सुरक्षा देणाऱ्या पंतप्रधानांच्या दोन विमा... 
२०१४ मध्ये सत्तेवर येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात सर्वसामान्यांच्या आवाक्यातील विमा योजनेची घोषणा केली हाेती. तर ९ मे २०१५ पासून प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवनज्योती बीमा योजनेला प्रत्यक्षात सुरुवात झाली. दोन्ही विमा योजनांचा वार्षिक हप्ता भरण्यासाठी बँकांमध्ये ऑटो डेबीटची व्यवस्था आहे. ३१ मे रोजी खात्यातून आपोआप हप्त्याच्या रकमेची कपात होते. महाराष्ट्रात योजनांच्या अंमलबजावणीसाठी लीड बँक म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रकडे जबाबदारी आहे. दोन्ही योजनांस अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. 


लोकांनी फायदा घ्यावा 
अवघ्या ३४२ रुपयांत ४ लाख रुपयांचा विमा कवच मिळत असल्याची फार कमी लोकांना माहिती आहे. ही विमा योजना अधिकाधिक लाेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शिबिर आयोजित करून याची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. 
- प्रदीप कुतवळ, एलडीएम आणि मुख्य प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र 

बातम्या आणखी आहेत...