आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक शिक्षकांना पुन्हा अतिरिक्त ठरण्याची भीती; संच मान्यतेची प्रक्रिया सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सध्या संच मान्यतेची प्रक्रिया शिक्षण विभागाच्या वतीने सुरू आहे. शाळांना सर्व माहिती ऑनलाइन पद्धतीने भरायची आहे. या संच मान्यतेसाठी अंतिम मुदत सुरुवातीला ३१ डिसेंबर देण्यात आली होती. ती नंतर वाढवून १५ जानेवारी करण्यात आली आहे. मात्र या संच मान्यतेतून पुन्हा शिक्षक अतिरिक्त होण्याची भीती निर्माण झाली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. वर्ग तुकड्या मान्यता, रिक्त जागांची भरती, आवश्यक इतर पदांकरिता शाळांना शिक्षण विभागाद्वारे संच मान्यता करून घेणे आवश्यक आहे. ज्यात विद्यार्थी संख्येपासून ते सुविधांसह शिक्षक संख्येचाही समावेश करण्यात येतो. 


सध्या राज्यभरात संच मान्यता घेणे सुरू आहे. यासाठी १५ जानेवारीपर्यंत मुदत आहे. जानेवारी २०१८ पर्यंतची विद्यार्थी संख्याच या संच मान्यतेत गृहीत धरली जाणार आहे. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात.. यामुळे आहे त्याच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात अडचणी असताना पुन्हा नव्याने अतिरिक्त शिक्षकांची भर पडणार आहे. त्यात पुन्हा ज्या संस्थेत शिक्षकांचे समायोजन करण्यात आले आहे, त्या संस्थेत त्यांना रुजू करुन घेतले जात नसल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...