आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाहासाठी आई - भावाचा विरोध असल्‍याने पोलिस ठाण्यात लावले धडाक्यात लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पिशोर- पिशोर येथे एका रुग्णालयात कामास असलेल्या सचिन उखर्डे आणि गावातीलच ज्योती नवले यांचे एकमेकांवर प्रेम होते सचिनने रीतसर ज्योतीच्या घरी लग्नाची मागणीसुद्धा घातली होती. परंतु मुलीच्या भावाचा या विवाहाला विरोध होता. दरम्यान ज्योतीला लग्नासाठी स्थळ येऊ लागल्याने अखेर रविवारी (दि.४) सायंकाळी मुलीने मुलाला घेऊन पिशोर पोलिस ठाणे गाठले.  


सहायक पोलिस निरीक्षक अभिजित मोरे, पोलिस उपनिरीक्षक जयराज भटकर व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी दोघांकडच्या घरच्यांना व गावातील प्रतिष्ठित नागरिकांना पोलिस ठाण्यात बोलावून समजावून सांगितले. मिया बिवी राजी तो क्या करेगा काजी, या म्हणीप्रमाणे आणि दोघेही सज्ञान असल्याने कायद्याने दोघेही आपला जोडीदार निवडू शकतात असे मोरे यांनी  पटवून दिल्यानंतर तसेच पळून जाऊन लग्न करण्यापेक्षा ठरवून लग्न करणे योग्य राहील, असे ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन्हीकडची मंडळी या लग्नास तयार झाली.  
यानंतर पोलिस ठाण्यातच नवरदेव आणि नवरी याना विवाहाचे कपडे व इतर साहित्य देऊन वाजत गाजत दिगर परिसरातील संत ज्ञानेश्वर मंदिरासमोर विवाह समारंभ पार पडला. या वेळी गावातील हजारो ग्रामस्थांनी या आगळ्या वेगळ्या विवाह समारंभाला हजेरी लावली. या विवाहासाठी योग्य मध्यस्थी केल्याबद्दल आणि तत्काळ तणाव निवळल्याबद्दल पिशोर पोलिस ठाण्याचे कौतुक होत आहे.

 

काकूने केले कन्यादान
वेळ सायंकाळी साडेपाच वाजताची. माझ्याकडे ठाण्यात गावातील एक तरुणी आली व माझे एका मुलावर प्रेम असून मला त्याच्या सोबतच विवाह करावयाचा आहे. जर विवाह लावून दिला नाही तर मी एक तर पळून जाईल िकंवा माझे बरे-वाईट करून घेईल, असे सांगितले.  घराच्यांचाही या लग्नाला विरोध असल्याचे मुलीने सांगितले. मुलगी सज्ञान असल्याने मी तिला समजावून सांगितले. मुलीच्या घरी फोन केला. तेव्हा आई व भावाचा विरोध होता. आम्ही मुलाला ठाण्यात बोलावले व त्यानंतर मुलीची काकू ठाण्यात आली. त्यांना समजावल्यानंतर काकूला मुलगी नसल्याने तिनेच या मुलीचे कन्यादान करण्याचे ठरवले. अन मग पाहता पाहता ही चर्चा गावभर पसरताच नातेवाईक व मित्रमंडळी ठाण्यात जमले. अखेर कुटुंबीयांच्या संमतीने रात्री आठ वाजता मुलीच्या काकूने नातेवाइकांकडून पैसे गोळा करून मुलीचा व मुलाचा लग्नाचा जोडा घेत ठाण्यातच लग्न लावून दिल्याने तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणावर विवाहाने पडदा पडल्याचे पिशोर पोलिस ठाण्याचे सपोनि अभिजित मोरे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...