आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार महिन्यांपासून देत होता मुलीला धमकी, रस्ता अडवून म्हणाला- माझ्याशी मैत्री कर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चार महिन्यांपासून पंधरा वर्षीय मुलीला मैत्रीसाठी धमकावणारा मवाली शशिकांत ऊर्फ सोनू राजेंद्र दानवे (३०, रा. विष्णुनगर, जवाहर कॉलनी) याला गुन्हे शाखा पोलिसांनी चोवीस तासांत अटक केली. दानवे हा शाळेतल्या मुलांसाठी रिक्षा चालवतो. २७ जानेवारी २०१८ रोजी त्याने पीडितेला अडवून छेडछाड करत धमकी देत माझ्याशी मैत्री कर, असा दम दिला. १८ एप्रिलला पुन्हा त्याने तिला अडवत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. तू फोन का करत नाहीस, असे म्हणाला. त्यावर त्याला खडे बोल सुनावले होते. 

बातम्या आणखी आहेत...