आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून दक्षिण अंदमानात, सात जूनपर्यंत महाराष्ट्रात; मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद -  दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरचा दक्षिण भाग व निकोबार बेटांवर शुक्रवारी मान्सून दाखल झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) जाहीर केले. येत्या दोन दिवसात ताे केरळात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचेही म्हटले आहे. दरम्यान, अरबी  समुद्रात निर्माण झालेले मेकुनू वादळ अाेमानच्या किनाऱ्यावर धडकण्याच्या तयारीत आहे.   

 
  id=\"spanId\"/> मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी  हिंदी महासागर, बंगालचा उपसागर व अरबी समुद्रात अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे २८ ते २९ मेपर्यंत मान्सून केरळात येऊ शकताे. असे झाल्यास महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत मान्सून येईल.  दरम्यान, पश्चिम मध्य अरबी समुद्रातील मेकुनू चक्रीवादळ वायव्येकडे सरकले असून ते शुक्रवारी रात्रीनंतर ओमानच्या किनाऱ्यावर सलालाह येथे धडकण्याची शक्यता आहे.

 

पावसाचा इशारा

पुणे वेधशाळेने राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा इशारा दिला आहे. २६ मे रोजी दक्षिण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस, २७ व २८ मे रोजी मध्य महाराष्ट्रात तर २९ मे रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली. याच काळात विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाटेची शक्यता आहे.

 

बातम्या आणखी आहेत...