आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष: हरवल्याचा बनाव करणाऱ्या मातेने गुजरातेत विकले 6 महिन्यांचे बाळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- आपले सहा महिन्यांचे बाळ हरवले, अशी तक्रार सिल्लोड येथील एका महिलेने महिला बालकल्याण समितीकडे केली होती. याप्रकरणी समितीच्या आदेशावरून सिल्लोड पोलिसांनी तपास केला असता हे बाळ हरवले नसून सदरील मातेनेच गुजरातमधील एका व्यक्तीला ते विक्री केल्याचे समोर आले अाहे. याप्रकरणी सिल्लोड पोलिसांनी बाळ विकणाऱ्या मातेसह विकत घेणाऱ्या दांपत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 


रेखा राजू गोडस्वामी-पुरी असे या मातेचे नाव आहे. दि. १६ सप्टेंबर २०१७ रोजी रेखाने जिल्हा महिला बालकल्याण समितीकडे आपले बाळ हरवल्याची तक्रार केली होती. समितीच्या अध्यक्षा अॅड. रेणुका घुले यांनी याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिस ठाण्याला तपास करण्याचे आदेश दिले होते. सिल्लोड पोलिसांनी केलेल्या तपासानुसार खुद्द रेखानेच हे बाळ गुजरातमधील मेहसाना जिल्ह्यातील रालेसना या गावातील मणीलाल पटेल या व्यक्तीला विक्री केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार मणीलाल पटेल त्यांचे नातेवाईक संजय पटेल, पल्लवी पटेल यांच्यासह रेखा गोडस्वामी हिलादेखील सिल्लोड पोलिस ठाण्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तपास करून पोलिस ठाण्याने महिला बालकल्याण समितीकडे अहवाल दिल्यानंतर समितीने रेखासह पटेल दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सिल्लोड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 


बाळ अद्याप गुजरातमध्येच
हे बाळ कुणासाठी किंवा कशासाठी खरेदी केले होते, याचा उलगडा पोलिसांनाही अजून झालेला नाही. सध्या हे बाळ मणीलाल पटेल यांच्या नातेवाइकांकडे गुजरातमध्येच आहे. आठ दिवसांत या बाळाला महिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द करण्याचे आदेश दिले आहेत. 
-अॅड. रेणुका घुले, अध्यक्षा, महिला बालकल्याण समिती 

 

नातेवाइकांसमक्ष केला सौदा 
रेखानेआपल्या पोटच्या मुलाचा सौदा काही नातेवाइकांदेखतच केला. रेखासोबत तिची आई दाजी होते, तर खरेदी करणारे मणीलाल पटेल यांच्यासोबत पल्लवी पटेल ही गुजरातची महिलाही होती. विशेष म्हणजे पटेल आणि रेखा यांनी बाळ सुपूर्द केल्याबाबत बाँडवर समझोतापत्रही तयार केले होते. हे समझोतापत्र आणि जन्मदाखला मणीलाल पटेल यांच्याकडे सापडला. 

बातम्या आणखी आहेत...