आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ तीन दिवस बसून होती मनोरुग्ण आई; अखेर तिचाही मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलाच्या मृत्यूनंतर काल रात्री मनोरूग्ण आईने देखील या जगाचा निरोप घेतला. - Divya Marathi
मुलाच्या मृत्यूनंतर काल रात्री मनोरूग्ण आईने देखील या जगाचा निरोप घेतला.

औरंगाबाद- तीन दिवस मुलाच्या कुजलेल्या मृतदेहाजवळ बसलेल्या मनोरुग्ण आईने अखेर मंगळवारी प्राण सोडले. पडेगावातील पॉवर हाऊसमागील गणेशनगर येथील शालिग्राम बाखरे (५०) यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरात आढळून होता आला होता. तेव्हा त्यांच्या मनोरुग्ण आई देवकाबाई बाखरे (९०) तीन दिवस मुलाजवळ बसून होत्या. छावणी पोलिसांनी शालिग्राम यांचा मृतदेह घाटीत पाठवला होता, तर देवकाबाई यांनाही घाटीत उपचारासाठी दाखल केले होते. शालिग्राम यांच्यावर पडेगाव येथे नातेवाइकांनी अंत्यसंस्कार केले. इकडे रात्री नऊ वाजेच्या दरम्यान देवकाबाई यांनी प्राण सोडले. त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


शालिग्राम बाखरे २० वर्षांपासून गणेशनगरातील एका खोलीत मनोरुग्ण आई देवकीबाई (९०) सोबत राहत होते. शालिग्राम मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवत होते. सोमवारी (२१ मे) सकाळी शेजारी राहणारा रवींद्रसिंग भोंड (८ वर्षे) देवकीबाई यांच्यासाठी भाकरी घेऊन गेला होता. आतून कुबट वास येत असल्याचे त्याने सर्वांना सांगितले. हा प्रकार समजताच या भागातील शिवाजी गायकवाड यांनी ही माहिती छावणी पोलिसांना दिली. शालिग्राम यांच्या आई देवकीबाई यांना १०८ रुग्णवाहिकेने घाटीत दाखल करण्यात आले. देवकीबाई शालिग्रामच्या मृतदेहाजवळ पडून आकांताने ओरडत होत्या. तीन दिवसांपासून त्या उपाशी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. छावणी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शालिग्राम यांच्या मृत्यूचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. त्यानंतर काल रात्री देवकीबाई यांचे देखील निधन झाले. मुलानंतर आईने जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...