आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीड- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गारपिटीची रविवारी सकाळपासून मराठवाडा तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी पावसासह प्रचंड गारपिटीला सुरुवात झाली. रविवारी मराठवाड्याला अवकाळी पाऊस व गारपीटीने जोरदार तडाखा दिला. यात शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आज तातडीने शेतक-यांत जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. अनेकांची पिके झोपली आहेत तर अनेकांच्या घरांचे पत्रे उडून गेले व पडझड झाली. घरोघरी जाऊन माहिती घेणा-या प्रीतम मुंडे यांनी यावेळी कार्यकर्त्यांचा घरी चहा नाकारला. विकासकामांच्या उदघाटनाला आल्यावर चहा घेऊ, आता आपण जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतक-यांपर्यंत पोहचू असे सांगत प्रीतमताईंनी कार्यकर्ते नाराज होणार नाहीत याची काळजी घेतली.
रविवारी सकाळी झालेल्या गारपीटीत गेवराई, माजलगाव, शिरूर कासार, अंबाजोगाई या चार तालुक्याला मोठा तडाखा बसला होता. यावेळी शेतक-यांना धीर देताना आम्ही व प्रशासन तुमच्यासोबत आहोत. जिल्हाधिका-यांना भेटून झालेल्या नुकसानीची भरपाई शेतक-यांना तातडीने मिळेल असे आश्वस्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.