आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाचीसोबत लग्नाचा तगादा; मामाने काढला त्याचा काटा; रोहिला गल्लीतील चौघे अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सिटीचौक परिसरातील रोहिला गल्लीत रविवारी दुपारी झालेल्या खून प्रकरणाचा पोलिसांनी चोवीस तासांत उलगडा केला. मृत सय्यद अकील हुसेन हमीद हुसेन (४५, रा. नूर कॉलनी) याला सना बेगम फिरदोस शेख (१९) हिच्यासोबत लग्न करायचे होते. यावरून तिच्या मामाने चाकू भोसकून अकीलचा खून केला. याप्रकरणी सना, तिची आई खमरोन्निसा बेगम फिरदोस शेख (३९), मुलगा तय्यब शेख (२१) मामा शेख शफिक शेख कादरी (३९, रा. पडेगाव) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


अकीलचे कुटुंब अनेक वर्षांपासून ऑप्टिकलचा व्यवसाय करते. आठ वर्षांपूर्वी अकीलने हा व्यवसाय सोडून हकीमचे (वैद्य) शिक्षण घेऊन रुग्णांवर उपचार सुरू केले. यातूनच त्याची शेख खमरोन्निसा बेगमसोबत ओळख झाली. तिचे पती सौदीत चालक आहेत. दोन वर्षांपूर्वी दुसरा विवाह करून ते पडेगाव येथे राहण्यासाठी गेले. अकील खमरोन्निसा हे एकमेकांच्या घरी जात असत. त्यामुळे खमरोन्निसाचा मोठा मुलगा तय्यब मुलगी सना अकीलला ओळखत होते. 


अकीलने काही महिन्यांपासून सनासोबत लग्न करण्याचा तगादा लावला. यामुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाला. हा प्रकार खमरोन्निसाचा भाऊ शेख शफिक याला समजला. रविवारी त्याने अकीलला जेवण करण्यासाठी घरी बोलावले. तेथे त्यांच्यात पुन्हा वाद झाला. तेव्हा शफिक तय्यबने अकीलच्या पोट छातीवर चाकूने सपासप वार केले. यात अकीलचा मृत्यू झाला. याप्रकरणी इस्माईल याकूब यांनी सिटी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तिघांना सोमवारी न्यायालयात हजर केले असता गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. 


शफिकने घेतले होते उपचार
खमरोन्निसाही अकीलकडे उपचार घेत असतानाच तिचा भाऊ शफिक हा मूल होत नसल्याने उपचार घेत होता. यादरम्यान शफिकचे मानसिक संतुलन बिघडायला लागले. पडेगाव येथील मानसिक आरोग्य केंद्रात त्याने उपचार करून घेतले. अकीलने मुद्दाम आपल्याला औषध किंवा इतर मार्गाने मानसिक रुग्ण केल्याचा त्याला दाट संशय होता. यातून अकीलचा बदला घेण्याची भावना तीव्र झाली होती. यातच अकील आपल्या बहिणीच्या मुलीवर वाईट नजर ठेवत असल्याचे कळताच रविवारी त्याने अकीलचा काटा काढला. 


सनाने घरातील रक्त पुसले 
शफिकतय्यबने अकीलवर चाकूने वार केले तेव्हा आई-मुलगी तेथेच उभ्या होत्या. गंभीर जखमी झाल्याने घरात अकीलचे रक्त सांडले. खमरोन्निसा तय्यबने अकीलचा मोबाइल घेऊन त्याचे नातेवाईक शेख इस्माईल शेख याकूब (रा. किराडपुरा) यांना अकीलसोबत काहीतरी विपरीत घडल्याचे सांगून त्याला रिक्षातून घाटीत नेले, तर सनाने घरात सांडलेले रक्त पुसून फरशी स्वच्छ केली. 

बातम्या आणखी आहेत...