आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लॉटिंगच्या वादातून प्लंबरचा खून; आतडी, गुप्तांग कापून विहिरीत फेकले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- प्लॉटिंगच्या वादातून बेगमपुरा भागातील प्लंबरचे अपहरण केल्यानंतर त्याची पाच जणांनी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणातील मोहंमद अलिमोद्दीन ऊर्फ अलीम मिनाजोद्दीन अन्सारी (४५, रा. हिलाल कॉलनी) आणि शेख इरफान ऊर्फ बाबा लोली शेख करीम (२२, रा. आसेफिया कॉलनी) या दोघांना बेगमपुरा पोलिसांनी अटक केली असून त्यांना अपहरणप्रकरणी न्यायालयाने २३ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 


शेख जब्बार शेख गफ्फार (३०) हा १६ मे रोजी दुपारी तीनच्या सुमारास दुचाकीने घराबाहेर पडला होता. पांढऱ्या कारमध्ये आलेल्या माेहंमद अलिमोद्दीन, बाबा लोली, शेख अमजद शेख असद तसेच दोन खुनाचे गुन्हे दाखल असलेल्या शेख वाजेद ऊर्फ बबला शेख असद आणि सिकंदर (रा. गुलाबवाडी) यांनी खाम नदीजवळील घोड्याच्या तबेल्याजवळून त्याचे अपहरण केले होते. रविवारी रात्री बेगमपुरा पोलिसांना बबलाने फोन करत आपणच त्याचा खून केला असून मृतदेह दौलताबादेतील एका विहिरीत फेकल्याचे सांगितले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता जब्बारच्या पोटाचे आतडे कापून त्यात दगड भरून पोट कापडाने बांधण्यात आले होते. त्याचे गुप्तांगदेखील कापल्याचे दिसून आले. त्याच्यावर चाकूचे २८ वार केले होते. 


दोघांना अटक, तिघांचा शोध सुरू 
पोलिसांनी अपहरणाच्या तक्रारीत नमूद असलेल्या मोहंमद अलिमोद्दीन व बाबा लोलीला घरातून अटक केली, तर उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. मात्र, नेमका वाद कोणत्या प्लॉटवरून झाला, जब्बारची हत्या कुठे करण्यात आली याचा पोलिस शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...