आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजय मुंडेंनी मला \'स्वाभिमान\' शिकवू नये, सुरू झालो तर अवघड; नारायण राणेंचा \'प्रहार\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- धनंजय मुंडे खूप लहान आहेत, त्यांनी उगाच माझ्यावर बोलू नये मी सुरु झालो तर अवघड होईल आणि किमान त्यांनी मला स्वाभिमान शिकवू नये, अशा शब्दात नारायण राणे यांनी धनंजय मुंडे याना टोला दिला. धनंजय मुंडे यांनी नारायण राणेंच्या आज होणाऱ्या सभेवर टीका केली होती.

 

 

...तर काही फरक पडणार नाही

मी स्वतः मंत्रिमंडळ समावेशाची वाट पाहतोय. काही दिवसा आधीही चर्चा झाली, आता ते लवकरात लवकर म्हणाले, आता बघूया किती लवकर ते असे राणे यांनी मंत्रीमंडळातील समावेशाबाबत म्हटले आहे. शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तर काही फरक पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला. मराठवाडा मागासलेपणासाठी शिवसेनाइतकेच भाजप ही जबाबदार असल्याचे ते म्हणाले. 4 वेळा खासदार राहिलेले खैरे आदित्य ठाकरेंच्या पाय पडतात. खैरे आणि अभ्यासाचा संबध काय, असे मत राणेंनी व्यक्त केले.

 

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...