आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नीट-पीजी’ परीक्षेचे केंद्र औरंगाबादेत; आमदार सतीश चव्हाण यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन’च्या वतीने जानेवारी-२०१८ मध्ये एमएस, एमडी आदी पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ‘नीट-पीजी’ परीक्षेचे केंद्र औरंगाबादला देण्याची तयारी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दाखवली असल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी कळवले आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल पदयात्रा डिसेंबर रोजी केळझर (जि.वर्धा) येथे आली असता चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यामार्फत जावडेकर यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. औरंगाबादला परीक्षा केंद्र देणे गरजेचे असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी संबंधित विभागाला आदेश देण्याचे आश्वासन दिले. 


जानेवारी ही परीक्षा होत आहे. गेली दोन वर्षे ‘नीट-पीजी’ परीक्षेसाठी औरंगाबाद केंद्र होते. परंतु यंदा केंद्रच दिले नसल्याचे चव्हाण यांनी जावडेकर यांच्या निदर्शनास आणून दिले. मराठवाडा विभागात नांदेड हे एकमेव केंद्र आहे. औरंगाबाद शहरात नामांकित शैक्षणिक संस्था असून मराठवाड्याबरोबरच जळगाव, अहमदनगर, बुलडाणा, धुळे आदी जिल्ह्यांतील विद्यार्थी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे औरंगाबादेतील केंद्राचे महत्व चव्हाणांनी पटवून दिले. 

बातम्या आणखी आहेत...