आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गत वर्षभरात जिल्ह्यात रोज ३ अपघात; ५३३ जणांनी गमावला जीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - गत वर्षभरातला प्रत्येक दिवस अपघातवार ठरला. वर्षभरात जिल्ह्यात दररोज तीन अपघात झाले आहेत. वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या १३२३ रस्ते अपघातांत १३०१ जण जखमी, तर ५३३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील ६६६ अपघात, ६८१ जखमी, १४३ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे. ग्रामीण व शहर वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या नोंदींतून ही भयावह बाब समोर आली आहे. 

 

५ कोटी ५६ लाख दंड वसूल 
सिग्नल तोडणे, अवैध प्रवासी वाहतूक, क्षमतेपेक्षा जास्त मालवाहतूक, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, हेल्मेट न घालणे, आयुष्यमान संपलेली वाहने, पीयूसी नसणे, राँग साइड वाहन चालवणे, भरधाव वाहन चालवणे, रस्त्यावर आडवेतिडवे, वाहतुकीला अडथळा होईल असे वाहन उभे करणे, अशा विविध मोटार वाहन नियमांचे व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या जिल्ह्यातील १ लाख ८७ हजार ३८४ वाहनधारकांकडून ५ कोटी ५६ लाख ५९ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 


४० टक्के जखमींचा घटनास्थळीच मृत्यू 
राज्यातील वाहनांची संख्या तीन कोटींवर, जिल्ह्यातील वाहनांची संख्या १७ लाखांवर पोहोचली आहे. अपघातांचे प्राणही वाढत असून जिल्ह्यात गतवर्षी झालेल्या अपघातांतील ४० टक्क्यांपेक्षा (५३३) अधिक जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. गत तीन महिन्यांत शहरात १२४ अपघात झाले असून त्यात ३४ जणांनी जीव गमावला, तर ११३ जखमी झाले. 


'हिट अँड रन'मध्ये तरतूद कागदावर 
भरधाव वाहनांच्या धडकेमुळे अनेक निष्पाप नागरिक जखमी होतात. अशा प्रकरणात (हिट अँड रन) जखमींच्या कुटुंबीयांसाठी मोटार वाहन अधिनियम १९८९ मध्ये सोलेशियम योजना लागू करण्यात आली आहे. त्याअंतर्गत १२, ५०० ते २५ हजार रुपये तातडीची मदत देणे अनिवार्य आहे. मात्र, एकाही प्रकरणात जखमींना ही मदत मिळाल्याची नोंद नाही. 

बातम्या आणखी आहेत...