आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रम निर्माण करण्यासाठी भाजपकडून युतीचे पिल्लू, पर्यावरणमंत्री रामदास कदमांकडून टीकास्त्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींनी अफाट आश्वासने दिली. त्यामुळे लोकांना ते देवदूत वाटत होते. परंतु आता परिस्थिती उलटी झाली आहे. कालचा गोंधळ चांगला होता, असे म्हणण्याची वेळ सर्वांवरच आली आहे. मतदार आता शिवसेनेकडे मोठ्या आशेने पाहत आहेत. आम्ही स्वबळावर लढून सर्वाधिक जागा जिंकू, असा दावा शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शुक्रवारी औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना केला. 

आ. जाधवांना सल्ला 

'जाहीर बोलू नको, तुझ्या पत्नीला उमेदवारी देऊ!' 
औरंगाबाद। खासदार चंद्रकांत खैरे शिवसेना संपवतील, त्यामुळे त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये, असे बोलण्याचे धाडस दाखवणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्याशी शिवसेना नेते व पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मध्यस्थी केली. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, हर्षवर्धनशी मी चर्चा केली. जे काय वाद असतील ते वरिष्ठांना सांगावेत, माध्यमांशी जाहीरपणे बोलू नको, त्याची जी कदम म्हणाले, भाजपची अवस्था काय झाली, याची कल्पना त्यांच्या नेत्यांना आली आहे. त्यामुळे युती होणार, असे सांगून निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या आमच्या कार्यकर्त्यांमध्ये ते संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा म्हणून आम्ही त्यांच्याशी युती करणार नाही म्हणजे नाहीच. शेतकरी, उद्योजक, रोजगार असे सर्वच समाधानी नाहीत. त्यांनी लॉलिपॉप देण्यात आले होते. त्यातील काहीही झालेले नाही. सर्व गुंडांना पक्षात घेण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे. त्यामुळे बलात्कार आणि खुनांमध्ये भाजपच पुढे गेला आहे. मतदारांनी याची आता जाणीव झाली आहे. आम्ही ज्या मतदारसंघात यापूर्वी लोकसभा निवडणूक लढवली नाही, अशा ठिकाणीही आम्हाला उमेदवाराची चिंता नाही. उमेदवाराचीही नाही आणि जिंकण्याचीही चिंता नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले तरी आम्हाला फरक पडणार नाही, आम्हीच नंबर एक असू, असा दावा त्यांनी केला. दरम्यान, ज्यांना उमेदवारी दिली जाणार आहे, अशांनी कामाला लागावे, अशा सूचना लवकरच दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


शिवशाही विरुद्ध गुंडशाही : युतीकडून जनतेला शिवशाही अपेक्षित होती. परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. फक्त शिवसेनाच लोकांना अपेक्षित शिवशाही देऊ शकते. भाजपकडून तर फक्त गुंडशाहीच सुरू आहे, असा आरोपही कदमांनी केला. 


पालकमंत्र्यांशी खैरेंचे वाद नाही : पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याशी खैरेंचे वाद झाल्याने पुन्हा पालकमंत्री बदलला जाईल काय, असे विचारले असता, खैरे आणि सावंत यांच्यात काहीही वाद नसल्याचे कदमांनी हसत सांगितले. तुम्ही पालकमंत्री असताना वाद होत होते, तसेच वाद आताही होतात, या प्रश्नावर तेव्हाही वाद नव्हते आणि आताही नाहीत. सारखेच चित्र असल्याचे ते विनोदाने सांगितले. चंद्रकांत खैरेच पुन्हा खासदार होतील, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...