आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांना पोलिस बँड पथक देणार पहिल्यांदाच मानवंदना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शनिवारी मिरवणूक निघणाऱ्या शहरातील मुख्य मार्गांच्या वाहतुुकीत पोलिसांनी सकाळी १० ते रात्री १२ पर्यंत बदल केला आहे. प्रामुख्याने क्रांती चौक, भडकल गेट, टीव्ही सेंटर आणि विद्यापीठ गेट या भागातून सकाळी वाहन रॅली, अभिवादन रॅली आणि संध्याकाळी मिरवणूक निघणार आहे. सकाळी ११ वाजता भडकल गेट येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येईल. मिरवणुकीच्या मार्गावर महापालिकेतर्फे पाण्याचे टँकर ठेवण्यात येणार आहेत. मिरवणुकीच्या मार्गांवर साचलेला कचरा उचलून हे मार्ग चकाचक करण्यास शुक्रवारपासूनच सुरुवात झाली आहे. 

 

सुरक्षेसाठी ३ उपायुक्त, ६ सहायक पोलिस आयुक्त, २० पोलिस निरीक्षक, ६४ पोलिस उपनिरीक्षक, सहायक पोलिस उपनिरीक्षक, ९३६ पोलिस शिपाई, ९४ महिला पोलिस शिपाई, ३०० होमगार्ड, १०० महिला होमगार्ड, १ एसआरपीएफची एक तुकडी, १०० विशेष पोलिस अधिकारी असे जवळपास १५०० हजार कर्मचारी तैनात राहतील. ७३ ठिकाणी फिक्स पॉइंट असतील. १७ पेट्रोलिंग व्हॅन, १७ मोबाइल व्हॅन १० पीसीआर व्हॅन, स्ट्रायकिंग फोर्स, दंगा नियंत्रण पथक तैनात राहील. 


भडकल गेटवर सकाळी ८ वाजता मानवंदना 
बाबासाहेबांच्या मुख्य पुतळ्यांना पोलिस बँड पथकाकडून मानवंदना देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानुसार शनिवारी सकाळी ८ वा. भडकल गेट येथे मानवंदना दिली जाईल. एसआरपीचे निरीक्षक राजेंद्र कत्तुल या पथकाचे नेतृत्व करतील. किमान अर्धा तास हा कार्यक्रम चालेल. त्यानंतर सर्वपक्षीय उत्सव समितीची सकाळी ९ वाजता अभिवादन सभा होईल. ही सभा किमान दीड तास सुरू राहील. त्यामुळे ९ ते १०. ३० पर्यंत वाहनधारकांनी भडकल गेट चौकात येण्याचे टाळावे. 


आज सकाळी १० वाजेपासून हे मार्ग बंद : क्रांती चौक- सिल्लेखाना- पैठण गेट- गुलमंडी- सिटी चौक- जुना बाजार - भडकल गेटपर्यंत शहागंज - गांधी पुतळा- सराफा- सिटी चौक. औरंगपुरा पोलिस चौकी ते बाराभाई ताजियापर्यंत. 


या मार्गावर एकेरी वाहतूक : 
हडको एन -१२ येथील नर्सरी - गोदावरी पब्लिक स्कूल- टीव्ही सेंटर - एन ९ - अयोध्यानगर- शिवनेरी काॅलनी- सिडको एन ७ शाॅपिंग सेंटर या मार्गावरील वाहतूक मिरवणूक सुरू असेपर्यंत एकेरी मार्गावरून वळवण्यात आली आहे. 


सकाळी ६ वाजता रन फॉर इक्वॅलिटी 
रन फाॅर इक्वॅलिटी मॅरेथाॅन सकाळी ६ वाजता विद्यापीठ गेट येथून निघेल. ही मॅरेथाॅन लिटिल फ्लाॅवर स्कूल, मिलकाॅर्नर, समर्थनगर, विवेकानंद काॅलेज, क्रांती चौक, पैठण गेट, टिळकपथमार्गे औरंगपुरा, खडकेश्वर, टाऊन हाॅलमार्गे पुन्हा िवद्यापीठ गेटसमोर समारोप होईल. या शर्यतीत अडीच हजार धावपटू सहभागी होतील. मॅरेथाॅनदरम्यान वाहनधारकांनी या मार्गावर जाणे टाळावे. 


या पर्यायी मार्गांचा वापर करा 
 क्रांती चौक ते पैठण गेट मार्गासाठी सतीश मोटर्स, सावरकर चौक, निराला बाजार, औरंगपुरा या मार्गाचा वापर करावा. 
 चेलीपुऱ्याकडून येणाऱ्या वाहनधारकांना कामाक्षी लाॅज, महापालिका मुख्यालयासमोरून जाता येईल. 
 जळगाव मार्गाकडून येणारी वाहने हर्सूल टी पाॅइंट, जळगाव टी पाॅइंट, क्रांती चौक उड्डाणपुलावरून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातील. 
 मिलकाॅर्नर येथून वळून पुन्हा बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक उड्डाणपुलावरून मोंढा नाका, जळगाव टी पाॅइंटमार्गे जातील. 
 नगरकडून येणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, क्रांती चौक उड्डाणपुलावरून जळगाव टी पाॅइंट आणि हर्सूल टी पाॅइंटमार्गे जातील. 

बातम्या आणखी आहेत...