आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने, चांदी, एलपीजी, रॉकेल, घरगुती सामान वाहतूक ई-वे बिलमुक्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - देशातील १४ राज्यात ई-वे बिल एप्रिलमध्ये लागू झाल्यानंतर महाराष्ट्रासह उर्वरित १६ राज्यांत १ जूनपासून लागू होत आहे. यात सोने-चांदी,चलनी नोटा, एलपीजी, घरगुती सामानाची वाहतूक, पोस्टल बॅगेज, मोती, प्रवाळांचे दागिने या वाहतुकीवर ई-वे बिल आकारले जाणार नाही, अशी माहिती औरंगाबाद येथील केंद्रीय जीएसटी विभागाचे सहआयुक्त अशोककुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


देशातील २९ राज्यांत १ एप्रिलपासून ई-वे बिल लागू होणार होते. यातील १४ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशाने ते लागू केले. मात्र महाराष्ट्रासह १६ राज्यांत ते लागू करण्यात आले नाही. तो निर्णय राज्य सरकारवर सोडण्यात आला होता. आता मात्र १ जूनपासून तो संपूर्ण देशात राज्यांतर्गत लागू केला जाणार आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातून राज्याबाहेर जाणाऱ्या वाहतुकीवर ई-वे बिल आकारले जात होते ते आता राज्यातील वाहतुकीसाठी १ जूनपासून लागू होणार आहे. 


या राज्यात आधीच अंमलबजावणी : 
कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, केरळ, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, त्रिपुरा, उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेश, मेघालय, सिक्कीम, पुद्दुचेरी (केंद्रशासित प्रदेश) या राज्यांत १ ते २५ एप्रिल २०१८ मध्ये ई-वे बिल लागू झाले. आता १ जूनपासून महाराष्ट्रासह उर्वरित १६ राज्यांत ते लागू केले जाणार आहे. 


रेडिओ फ्रिक्वेन्सी कोडमुळे टोल नाक्यांवरची गर्दी टळेल 
राज्यात किंवा देशात ट्रकमधून ५ हजारांचा माल न्यायचा असेल तर १०० किमीची मर्यादा आहे. त्या ट्रकला बाराअंकी ई-वे बिल नंबर दिला जाईल. तो टोलनाक्यावरच्या स्क्रीनवर दिसेल. त्यामुळे ट्रक थांबवला जाणार नाही. 


ट्रक थांबवल्यास करा तक्रार 
तपासणीच्या नावाखाली ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ ट्रक थांबवला तर ट्रकचालक वा मालक जीएसटी विभागाच्या नोडल ऑफिसरकडे तक्रार करू शकतो. 


तीस सेकंदांत विनाशुल्क मिळणार 
औरंगाबादहून ट्रकने माल मुंबईला पाठवायचा असेल तर ३० सेकंदांत मोबइल, अॅप, नेट अशा साधनावरून ई-वे बिल नंबर घेता येईल. 


....तर सोने योग्य स्थळी पोहोचणार नाही? : सोन्या-चांदीची वाहतूक का वगळली? येथेच मोठी करचोरी होते असे विचारल्यावर सहआयुक्त म्हणाले, आपल्या देशात अजून हा कायदा रुजवावा लागत आहे. लोकभावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला. सोने -चांदीचे बिल फाटले कीत्याची चोरी होण्याचाच धोका लक्षात घेऊन ही वाहतूक ई-वे बिलातून वगळली. 


चेकपोस्ट राहणार नाहीत 
ई-वे बिल अर्थात वाहतुकीवर नियंत्रण ऑनलाइन पद्धतीनेच होणार आहे. यात सरकारला संशय असेल त्या ठिकाणीच थेट अधिकाऱ्यांना सूचना देऊन तपासणी होईल. यासाठी कुठलेही चेकपाेस्ट नसतील. वाहनांच्या रांगा लागणार नाहीत. 


बैलगाडी, सायकल, हातगाडीवरील वाहतुकीला सूट 
बैलगाडी, सायकल, हातगाडीवरून कुणी वाहतूक करीत असेल तर या वाहतुकीला ई-वे बिलमधून वगळले आहे. 

बातम्या आणखी आहेत...