आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातगाडीवाल्यांनी कोणाच्या आशीर्वादाने रस्ते घशात घातले ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मे महिन्याच्या अखेरीस शहागंज, सिटी चौक .भागात दुकानांसमोर हातगाड्यांवर मीना बाजार सुरू होण्याच्या हालचाली होत आहेत. त्यामुळे व्यापारी आक्रमक झाले आहेत. महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेच्या व्यापारी आघाडीने त्यात पुढाकार घेतला असून मुख्य बाजारपेठांतील रस्ते हातगाडीवाल्यांनी कोणाच्या आशीर्वादाने घशात घातले आहेत, असा सवाल त्यांनी प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांना केला आणि हातगाडीवाल्यांवर कारवाईची मागणी केली. तेव्हा अतिक्रमण काढणे, मार्किंग करणे, हॉकर्स झोनची अंमलबजावणी करण्याचे काम मुळात मनपाचेच आहे. त्यांनी ते केले नाही तर आमच्याकडे का येता,असा प्रतिसवाल भारंबेंनी केला. तुम्ही मनपाच्या अतिक्रमण हटाव विभागावर दबाव आणा. आम्ही बंदोबस्तासाठी आवश्यक बळ देऊ, असे आश्वासनही दिले. 

 

मेअखेरीस मीना बाजार 
रमजान ईदच्या होण्याच्या वीस दिवस आधी म्हणजे मे महिनाअखेरीस मीना बाजार भरणार आहे. त्यात नित्योपयोगाच्या वस्तू स्वस्तात मिळत असल्याने सर्व समाजाचे लोक खरेदीसाठी येत असतात. त्या काळात शहागंज ते सिटी चौकपर्यंतचा रस्ता वाहतुकीला बंद अशी परिस्थिती असेल. 


महिला, तरुणींना होणाऱ्या त्रासाचे व्हिडिओ पाठवा : भारंबे 
पार्किंग, वाहतुकीसंदर्भातील अडचणींबाबत पाहणी करण्याच्या सूचना भारंबे यांनी दिल्या. परंतु हॉकर्स झोन, मार्किंग, अतिक्रमण ही सर्व कामे पालिकेची आहेत. त्यांनी बंदोबस्त मागितला की तो देऊ, परंतु अतिक्रमण काढण्याचे काम आमचे नाही. बाकी वाहतुकीसंदर्भात काय करता येईल, महिला-तरुणींना होणारा त्रास अशा घटनांचे शक्य झाल्यास मला व्हिडिओ पाठवा किंवा मीसुद्धा उद्या स्वत: रस्त्यांची पाहणी करतो व आवश्यक ती कारवाई करतो, असेही ते म्हणाले. 


माझ्यावरच केस : शेवगण 
मी अतिक्रमणासंदर्भात कारवाई करण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्याविरोधातच न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयानेदेखील अतिक्रमण काढण्याचे काम तुमचे नाही, असे स्पष्ट सांगितले. अशा वेळी पोलिसांनी काय करायचे ? 


काय आहे नेमका आक्षेप 
मीना बाजारात वीस ते तीस दिवस सर्व बाजारात हातगाड्या रस्त्यावर उभ्या राहत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. 
शहागंज, सराफा, सिटी चौक, धावणी मोहल्ला, बाेहरी कठडा, श्रीमंत गल्ली, नास गल्ली, कासारी बाजार, राजाबाजार येथील रस्ते रुंदीकरणांतर्गत २०१२ मध्ये मनपाने अधिग्रहित केले, तिथे फेरीवाले, अनधिकृत हातगाडीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. 


 

बातम्या आणखी आहेत...