आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी जिवंत असेपर्यंत अनुदानाचे पैसे मिळाले तर कर्जमुक्त होईन, मरणाने त्यांना कवटाळले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - मी जिवंत आहे तोपर्यंत विहिरीचे पैसे मिळाले तर मी कर्जातून मुक्त होईल असे माझे वडील(सांडू संपत शिरसाट) म्हणत होते. ते कॅन्सरच्या आजारपणाने ग्रस्त आहे. शनिवार दि. ३ फेब्रुवारी रोजी त्यांचे औरंगाबादेत उपचारादरम्यान निधन झाले. अन त्यांचे कर्जमुक्त होण्याचे स्वप्न अनुदान न मिळाल्याने अधूरे राहिले. अशी व्यथा मांडली त्यांचा मुलगा विष्णू सांडू शिरसाट यांनी....


विहीर भेटूनही फायदा नाही विहीर मिळाली नसती तर कर्जबाजारी झालो नसतो,आम्हाला २०१४/१५मधे रोजगार हमी योजनेअंतर्गत विहीर मंजूर झाली होती.वडिलांना फार मोठा आनंद झाला होता. विहिरीवर हिरव्यागार शेतीची स्वप्न पाहत जगण्याची उम्मेद निर्माण झाली होती. परंतु आज याच विहिरीत उडी घेऊन जीव देण्याशिवाय पर्याय उरला नाही.  


कोरडवाहू शेती बागायती होण्याचे स्वप्न साकार होणार होते. परंतु पैसे वेळेवर न मिळाल्याने विरजण पडले, खोदकामाचे पैसे कसेबसे मिळाले परंतु बांधकामाचे पैसे वेळेवर न मिळाल्याने कर्जबाजारी झालो,त्यात वडिलांना कॅन्सर झाला, विहिरीच्या बांधकामासाठी सिमेंट व लोखंड व्यापाऱ्याकडून अनुदानाच्या भरवशावर उधारीवर घेत  विहीरीचे काम वर्षाभरापूर्वी पूर्ण केले. मिस्तरीची मजूरी देण्यासाठी  पैसे नव्हते त्यात व्यापाऱ्याचे  पैसे कोठून देणार? अखेर खासगी सावकाराकडून कर्ज काढून पैसे फेडावे लागले. आता वडीलांना कॅन्सर आजार झाल्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करावे लागले त्यांची परीस्थिती आता नाजूक आहे. मी जिवंत आहे तोपर्यंत विहिरीचे पैसे मिळाले तर मी कर्जातून मुक्त होईल असे ते बोलत आहे. त्यांचे निधन झाल्याने आमच्यावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. एकीकडे वडिलांचे आजारपण व पैशावाल्यांचा तगादा यामुळे माझे संतुलन ढासाळले आहे. हे पैसे जर लवकर नाही मिळाले तर जमीन विकावी लागेल. 

 

 अनुदान मंजूर झाले, उधारी करून काम करून घेतले,  पैसे मिळेना, उदरनिर्वाहासाठी आता पंपावर रोजगार 

अनुदानाची विहीर मिळाली, परंतु पैशाचा पत्ता नाही... माय- बाप, पत्नी व मुले सोडून कामासाठी आता औरंगाबादला यावे लागले...  ही व्यथा आहे सय्यद शाकेर यांची त्यांच्याच शब्दात...


रोहयो अंतर्गत २०१४-१५ साली विहिर मंजूर झाली होती. तीन-चार वर्षांपासून विहीचे काम चालू आहे,त्यात निसर्ग ही कोपला शेतीच्या  उत्पन्नात खर्च ही निघाला नाही. विहिरीचे काम करताना पैसे वेळवर न मिळाल्याने कर्ज झाले. शेतीला फटका व विहीरीचे अनुदान वेळेवर मिळाले नाही.विहिर बांधकामासाठी साहित्य उधारीवर आणले. तसेच पाहुणे- मित्रांकडून हात उसने पैसे घेतले होते.  गावात काम नाही अखेर कुटुंबाचा उदारनिर्वाहसाठी औरंगाबाद येथे पंपावर काम करतो. 

 

विहिरींचे अनुदान मिळेना, व्याजाने पैसे काढून विहिरी करण्याची वेळ

औरंगाबाद जिल्ह्यातील  रोजगार हमी योजनेंतर्गत ३६३१ शेतकऱ्यांच्या विहीरी दोन तिन वर्षापासून निधी अभावी अपुर्ण असून यामधील कुशल (बांधकाम) व अकुशल (खोदकाम)ची साधारण ८५ कोटी, ५८ लाख २६ निधी अपेक्षित  असून अद्यापही पैसे मिळाले नसल्याने या बिलासंदर्भात शेतकऱ्यांनी पं.स.कडे बिलाची मागणी केली अनेक वेळा पंचायत समितीते चकरा मारत आहे. याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने याकडे संबंधित विभाग दुर्लक्ष करीत असल्याने विहीर लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. व्याजाने पैसे काढून दुकांनदाराचे पैसे द्यावे लागल्याने शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत.   


शासन मंजुरीप्रमाणे शेतकऱ्यांना २ लाख ९९ हजार लाभ मिळणे आवश्यक आहे. मात्र यापैकी शेतकऱ्यांना १ लाख ५० हजाराच्या आसपास बिले मिळाली आहेत. तर काही शेतकऱ्यांना खोदकामाचे पैसै मिळाले आहे.  उर्वरित  बिले विहिरीचे काम पूर्ण होवून चार-पाच वर्षाचा कालावधी लोटला असताना देखील मिळाले नाहीत. दुकानदाराकडून अनेकांनी या पैशाच्या भरवशावर उधारीने सिमेंट व लोखंड विकत घेतले होते. लेणदार किती दिवस पैसे थांबणार  पैसे देण्यासाठी अनेकांनी व्याजाने पैसे काढून पैसे भरले आहे. यामुळे ते कर्जाच्या खाईत लोटले गेले आहे.   पैसे मिळण्यासाठी वेळोवेळी पंचायत समितीकडे मागणी  करून देखील याकडे संबंधित अधिकारी यांच्याकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप विहीर लाभार्थी शेतकऱ्यांमधून होत असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. हे पैसै लवकर द्यावे अशी मागणी शेतकरी करीत आहे.   


जिल्ह्यात सुमारे साडे तीन हजार सिंचन विहिरी अर्धवट अवस्थेत पडलेल्या असून शासनाने निधी देण्यात हात आखडता घेतला आहे. मराठवाड्यावरच सतत अन्याय होत असल्याचे वडोद बाजार सर्कलचे जिल्हा परिषद सदस्य किशोर बलांडे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत प्रश्न उपस्थित केला होता.शासनाने राज्यातील सर्व जिल्ह्यांना समान न्यायाची भूमिका घ्यायला हवी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या जिल्ह्यासाठी सिंचन विहिरींबाबत स्वतंत्र निर्णय निर्गमित करून प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विहिरी जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहे. तर दुसरीकडे दुष्काळग्रस्त औरंगाबाद जिल्ह्यासाठी मात्र सावत्रपणाची  भूमिका घेतली आहे. मागील काही वर्षांपासून या जिल्ह्यातील विहिरींसाठी ७५ कोटींचा  निधी अडविण्यात आला आहे. मराठवाड्यावर अन्याय करून शासन काय साध्य करीत आहे, असा प्रश्न किशोर बलांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.  

 

महिनाभरात पैसे देऊ
सर्व विहिरी प्रोसेस मध्ये आहे, विहीरीच्या कामाचा अहवाल मागून महिन्याभरात निधी उपलब्ध होणार असून पुर्ण काम झालेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात येतील.
- संजय कुलकर्णी,  उप मुख्य कार्यकारी अधिकारी, रोहयो झेडप औरंगाबाद 

 

 

शेतकऱ्यांची कुचंबणा
शासनाकडे रोहयोचा वेगळा कर जमा असतो. त्या करा पोटी करोडो रूपये जमा होतात तो पैसा इतर ठिकाणी वळवला जात आहे. या सरकार कडे  बँकाचा तोटा भरून काढण्यासाठी पैसा आहे.शेतकऱ्यांची कुचंबणा  होत आहे. 
- डॉ कल्याण काळे, माजी आमदार

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, तालुकानिहाय जिल्ह्यातील विहिरींचा आढावा...

बातम्या आणखी आहेत...