आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खैरेंच्या उमेदवारी बदलावर आ. जाधव ठामच; म्हणाले- पत्नीला उमेदवारी दिल्यास मी सर्वात आनंदी नवरा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- खासदार चंद्रकांत खैरे हे शिवसेना संपवतील तेव्हा त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका, असे जाहीर भाष्य करून खळबळ उडवून देणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी माझ्या पत्नीला उमेदवारी मिळाली तर माझ्यासारखा नशीबवान माणूस मीच असेन. पत्नीला उमेदवारी देण्यास माझी काहीही हरकत नाही, असे म्हटले आहे. मात्र, खैरे यांची लोकसभेची उमेदवारी बदलावीच, या मागणीवर आपण ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 


खैरे-जाधव वादावर पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी जाधवांची समजूत काढताना 'रुसवे-फुगवे असले तरी जाहीरपणे बोलू नको. वेळप्रसंगी पत्नीला उमेदवारी देऊ,' असे सांगितले होते. त्यावर जाधव म्हणाले की, खा. खैरे यांची उमेदवारी पक्षाला बदलावीच लागेल. कारण ग्रामीण भागात खासदार फंडातील घोटाळा, शहरातील कचरा प्रश्न, समांतरचा प्रश्न, शहराची खुंटलेली प्रगती यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. 


मी सहजच बोललो, सीरियस घेऊ नका : कदम 
पालकमंत्री कदम यांनी अचानक जाधव यांच्या पत्नीचे नाव उमेदवारीसाठी का पुढे केले, असा प्रश्न अनेकांना पडला. त्यावर कदमांशी 'दिव्य मराठी'ने संपर्क साधला असता, मी सहज बोललो, हर्षवर्धन यांनी फार सीरियस घेऊ नये. पण मी जाधव दांपत्याशी चर्चा केली हे खरे. अर्थात त्यांच्या पत्नी उमेदवार होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...