आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला कर्मचाऱ्याला व्हिडिओ कॉल, नगरसेवकाने दिला अधिकाऱ्याला चोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याला वरिष्ठ पदाचा अतिरिक्त पदभार देतो म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याने सलगी वाढवली. प्रारंभी तिने दुर्लक्ष केले. मात्र या अधिकाऱ्याने रात्री-अपरात्री व्हिडिओ कॉल करणे, संदेश पाठवणे सुरू केले. हा प्रकार तिने नगरसेवकाला सांगितल्यानंतर नगरसेवकाने मंगळवारी सकाळी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या दालनात त्या अधिकाऱ्याच्या कानशिलात भडकवली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलीही तक्रार देण्यात आलेली नव्हती. घोडेले यांनीही बोलण्याचे टाळले. 

 

महापौर घोडेलेंच्या दालनात सकाळी आस्थापना विभागाची बैठक सुरू होती. तेव्हा बहुजन समाज पक्षाचा एक नगरसेवक कार्यकर्त्यांसमवेत दाखल झाला. कोठे आहे तो अधिकारी, अशी विचारणा त्याने आत येताच केली. तो अधिकारी दिसताच शिवीगाळ करत त्याच्या श्रीमुखात भडकवली. यात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यालाही ढकलून दिले. महापौरांसमक्ष हा प्रकार झाल्याने माझे दालन भांडण्यासाठी नाही. जो वाद असेल तो बाहेर जाऊन मिटवा असे सांगत नगरसेवकाला बाहेर काढले. त्यानंतर दुसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्याला वाद मिटवण्यासाठी बाहेर पाठवले. दरम्यान, त्या महिलेनेही पोलिसांत तक्रार केली नाही, तर मारहाण झाली म्हणून तक्रार करण्यासाठी तो अधिकारीही पुढे आला नाही. 

बातम्या आणखी आहेत...