आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - गौताळा अभयारण्यातून एक नीलगाय अचानक सायगव्हाण गावात आली. बघता बघता ती माणसाळली. मात्र पुन्हा जंगलात गेल्यावर कळप तिच्यापासून दूर पळू लागला. कळपाने बहिष्कृत केल्याची खात्री पटताच ती पुन्हा गावात आली. आता गावकऱ्यांनाही नकोशी झाली असून तिला पिंजऱ्यात ठेवण्याची मागणी ते करत आहेत.
गौताळा अभयारण्यात नीलगायीची संख्या मोठी आहे. त्या धष्टपुष्ट असल्या तरी फार भित्र्या असतात. माणसांची चाहूल लागताच वाऱ्याच्या वेगाने गायब होतात. अशीच एक नीलगाय चुकून गौताळा अभयारण्याजवळील सायगव्हाण गावात आली. ती माणसांमध्ये गेल्याने कळपाने पुन्हा स्वीकारले नाही. त्या पिल्लाने परत गावाकडे धाव घेतली. पाच वर्षात ते पूर्णपणे माणसाळले. अन्न-भाजीपाला, फळेही खाऊ लागले. त्याला माणसाची भाषा कळू लागली. मग ते गावातील लोकांच्या घरात जाऊ लागले. मात्र नीलगायीची शिकार करण्यासाठी बिबट्या गावात येऊ शकतो या भीतीने ग्रामस्थांनी वन अधिकाऱ्यांना या नीलगायीला जंगलात सोडण्याची मागणी केली. कळप स्वीकारत नसेल तर पिंजऱ्यात ठेवा, पण आता गावात येऊ देऊ नका, अशी विनंती केली. त्यानुसार वन अधिकाऱ्यांनी जंगलात सोडण्याचा प्रयत्न केला. पण ती माणसाळलेली असल्याने कळपाने पुन्हा नाकारले.
पर्यटकांच्या मागे फिरते
ही नीलगाय जंगलातून जाणाऱ्या रस्त्यावर, गावात भटकंती करताना दिसते. कुणी पर्यटक आला तर वाहनाजवळ येते. खायला दिले तर खाते. पर्यटकांच्या मागे फिरते. कळप स्वीकारत नाही, ग्रामस्थांना ती नको आहे. त्यामुळे वन अधिकारीच तिची देखभाल करत आहेत.
स्वतंत्र जगण्यास सक्षम होईल
Ãवन्यजीव लहान वयात मानवी वस्तीत आले तर ते लवकर माणसाळतात. दुसरीकडे त्यांच्या मागे माणसे येतील म्हणून कळपाला भीती वाटते. त्यामुळे ते त्याला बाहेर काढतात. काही काळाने त्या नीलगायीला सवय होईल आणि ती स्वतंत्रपणे जगण्यास सक्षम होईल. - डॉ. किशोर पाठक, वन्यजीव अभ्यासक
आम्ही सांभाळ करतोय
à या नीलगायीचा आम्हीच सांभाळ करत आहोत. कारण तिला कळपाने स्वीकारले नाही. ती घनदाट जंगलात न जाता बाहेरच असते. - बाळासाहेब जऱ्हाड, वनपरिक्षेत्र अधिकारी.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.