आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवारांच्‍या औरंगाबादेतील सभेत भाजप आमदार बंब यांच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- गंगापूर सहकारी साखर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत काही कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेत शनिवारी गोंधळ घातला. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. भाजपच्या कार्यकर्त्यांना सभेत पाठवून भाजपचे गंगापूरचे आमदार प्रशांत बंब यांनी गोंधळ घडवून आणल्याचा आरोप सभा आयोजकांनी केला आहे. 


हल्लाबोल मोर्चाच्या समारोपासाठी शनिवारी औरंगाबादेत विभागीय आयुक्तालयासमोर पवार यांची सभा झाली. सभेसाठी पवार व्यासपीठावर येताच काही कार्यकर्त्यांनी गंगापूर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या अशी मागणी केली होती. त्यानंतर पवार भाषणाला उभे राहिले तेव्हाही असाच प्रकार झाला. मात्र पवार यांनी याकडे दुर्लक्ष केले. पोलिस गर्दीत जाऊन पोहोचले होते. सभा संपल्यानंतरही पुन्हा काही कार्यकर्त्यांनी समोर धाव घेत, ‘पवार साहेब, गंगापूर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, जयंत पाटलांना काही सांगा’ अशी घोषणाबाजी करत पवार यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. गंगापूर कारखाना हा जयंत पाटील यांच्या कारखान्याने शेतकऱ्यांकडून विकत घेतला आहे, त्यामुळे येथील शेतकऱ्यांना पवार यांच्याकडे विनंती करायची होती, कारण येथील शेतकरी या प्रकरणावरून संतप्त होते, यापूर्वी शेतकरी  मंत्री दिवाकर रावते यांच्याही अंगावर गेले होते. पवारांना आम्ही विनंती करण्यासाठी जात असल्याचे त्यांनी सांगितले होते, असा युक्तिवाद आमदार बंब यांनी केला. 


केवळ स्टंटबाजी : आ. चव्हाण
गोंधळ घालणारे ते बंब यांचेच कार्यकर्ते होते. गंगापूर कारखाना प्रकरणात न्यायालयाने दिलेला निकालही ते मान्य करत नाहीत. त्यांना केवळ स्टंटबाजी करायची होती, असे राष्ट्रवादी  काँग्रेसचे आमदार सतीश चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...