आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साखरेचा भाव घसरणीवर उपाय सापडेना, भाव देणार तरी कसा? कारखानदार चिंताग्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड- उसाचे बंपर उत्पादन झाल्यामुळे साखरेचे भाव स्थिर राहावेत म्हणून केंद्र सरकारने वेगवेगळ्या योजना आखल्या आहेत. पण जास्त उत्पादन व मागणीवर परिणाम झाल्याने साखरेला भाव तर नाहीच, मात्र आता उठाव कमी झाल्याने साखर कारखानदार चिंताग्रस्त झाले आहेत. इच्छाशक्ती असूनही उसाला एफआरपीपेक्षा जास्त भाव देणे अवघड होऊन बसले आहे. जिल्ह्यात या वर्षी आजपर्यंत १२ लाख ५८ हजार मे. टनावर उसाचे गाळप झाल. ते मागच्या वर्षीच्या सहापट आहे. 


२०१५ - २०१६ मध्ये वरुणराजाने वक्रदृष्टी केल्याने मागच्या वर्षीच्या गाळप हंगामात विक्रमी घट झाली. मागच्या वर्षी महाराष्ट्रासह ऊसपट्टे असलेल्या राज्यात विक्रमी पाऊस पडला. महाराष्ट्र, दक्षिणात्य राज्यात उसाचे क्षेत्र वाढले. सरासरी ९.५० टक्के उतारा असल्यास उसाला प्रतिटन २५५० भाव देणे कारखान्यंावर बंधनकारक आहे. परंतु साखरेचे पडलेले भावामुळे साखर कारखान्यांपुढे चिंता वाढल्या आहेत. मागच्या महिन्यात साखरेचे भाव २९५० प्रतिक्विंटलवर आले होते. जागतिक बाजारातही भाव कमी असल्यामुळे, पाकिस्तानने  साखर निर्यातीवर १० टक्के अनुदान केल्यामुळे तिकडची साखर आयात होण्याची भीती होती. धाेका ओळखून आयात शुल्क ५० टक्क्यांवरून १०० टक्के केले. ८ फेब्रुवारीला विक्रीवर बंधने घातली. 

 

उसाअभावी गाळप बंद​

जिल्ह्याचा विचार केल्यास मागच्या वर्षी उसाअभावी केवळ छत्रपती संभाजीराजे, मुक्तेश्वर शुगर मिल व बारामती अॅग्रो हे तीनच साखर कारखाने चालू होते. जानेवारीच्या शेवटी या कारखान्यांनी उसाअभावी गाळप बंद केले आहे. मागच्या वर्षी जिल्ह्यात या तिन्ही कारखान्यांनी केवळ २ लाख ७९ हजार १५५ लाख मे. टनाचे गाळप करून २ लाख ४४ हजार १८९ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले हेाते. या वर्षीच्या गाळप हंगामात वरील तीन कारखान्यांव्यतिरिक्त संत एकनाथ अतुल शुगर, घृष्णेश्वर शुगर, शरद सहकारी या कारखान्यांची भर पडली आहे. जिल्ह्यात या वर्षी सहा कारखाने गाळप हंगामात उतरले असून या वर्षी (दि.१६) पर्यंत १२ लाख ५८ हजार ३५ मे.टन उसाचे गाळप करून ११ लाख ९५ हजार ९२५ क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन  केलेले आहे. हे उत्पादन मागच्या वर्षीपेक्षा सहापट आहे. मार्चच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत गाळप चालण्याची शक्यता असून शेवटपर्यंत १५ लाख मे. टनपर्यंत ऊस गाळपाची शक्यता आहे. ऊन तापू लागले आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, २०१७-१८ चा ऊस गाळप तुलनात्मक तक्ता, १६ फेब्रुवारी २०१८ अखेर ... 

बातम्या आणखी आहेत...