आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन जलकुंभांतील पाण्याचे नमुने दूषित, अहवालानंतर पाणीपुरवठा विभागाने वाढवली क्लोरिनची मात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - निम्म्या शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात 'दिव्य मराठी'ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर महापौर नंदकुमार घोडेले यांनी १३ टाक्यांतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी महापौरांना याचा अहवाल दिला. यात हडको-सिडकोसह जुन्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन जलकुंभात दूषित पाणी आढळून आले. त्यानंतर लगेच क्लोरिनची मात्रा वाढवून हे पाणी पिण्यायोग्य करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता सरताजसिंग चहल यांनी दिली. 

 

एन-५, एन-६, मरीमाता, दिल्ली गेट, पुंडलिकनगर, शहागंज, शिवाजीनगर, हर्सूल, क्रांती चौक, ज्युबिली पार्क, कोटला कॉलनी, ज्योतीनगर या जलकुंभातील पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले होते. त्याचा अहवाल तीन दिवसांपूर्वीच आला होता. मात्र तो जाहीर करण्यात येत नव्हता. अखेर शुक्रवारी तो महापौरांना देण्यात आला. यात एन-५, एन-६ आणि मरिमाता जलकुंभातील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे म्हटले अाहे. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाने तत्काळ पाण्यात क्लोरिनचे प्रमाण वाढवले. 


शुक्रवारी झाला शुद्ध पाणीपुरवठा : दूषित पाण्याच्या तक्रार वाढल्यानंतर महापौरांनी फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन औषधींची पाहणी केली. तेव्हा चार दिवस पुरेल एवढाच औषधसाठा असल्याचे आढळले. तेव्हा तत्काळ औषध खरेदी करण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. आता पाण्यात टाकण्यात येणाऱ्या औषधांचे प्रमाण वाढवल्याने शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याचे शुक्रवारच्या तपासणीत दिसून आले. 


पाण्याची दररोज तपासणी 
Ãपाणीपुरवठा करताना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. औषधींची मात्रा वाढवली आहे. तसेच आता दररोज पाण्याची तपासणी करून पुरवठा होत आहे. - नंदकुमार घोडेले, महापौर 

बातम्या आणखी आहेत...