आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NSUI च्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीविरोधात घोषणाबाजी, ग्राहकांना पेढे वाटून निषेध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरात NSUI च्या वतीने पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. सत्तेत आलेल्या मोदी सरकारने भारतीय जनतेला पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ करून हसत खेळत सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असा आरोप NSUI केला आहे. या दरवाढीच्या निमित्ताने औरंगाबाद जिल्हा NSUI च्या वतीने पेट्रोल-डिझेल ग्राहकांना पेढे वाटून सरकारच्या धोरणांचा आणि महागाई कमी करण्यात आलेल्या अपयशाचा निषेध करण्यात आला.


पेट्रोलच्‍या किंमती लवकरच वाढण्‍याची शक्‍यता निर्माण झाली आहे. प्रति लिटर आठ रूपये नुकसान होत असल्‍याचे सरकारी क्षेत्रातील तेल कंपनी इंडियन ऑइल कार्पोरेशनने (आयओसी)म्‍हटले आहे. पेट्रोलच्‍या दरात लवकर वाढ करण्‍यात यावी, यासाठी आयओसीच्‍या चेअरमननी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. दुसरीकडे नियोजन आयोगाचे उपाध्‍यक्ष मॉंटेकसिंग अहलुवालिया यांनीदेखील पेट्रोलियम पदार्थाच्‍या दरवाढीचे समर्थन केले आहे. पेट्रोलियम पदार्थांची दरवाढ न केल्‍यास कंपन्‍या लवकरच दिवाळखोरीत निघतील, असेही अहलुवालिया यांनी म्‍हटले आहे.


देशात सर्वाधिक पेट्रोलचा भाव हा मुंबई शहरात असून पेट्रोलवर असलेले कर कमी करण्याची मागणी करण्यात येत आहे. विरोधी पक्षांकडूनही याबाबत सरकारला लक्ष्य करण्यात येत आहे. मुंबईत पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये 70 पैसे तर डिझेलचे दर 72 रूपये 48 पैसे झाले आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 76.87 रुपये तर डिझेल 68.08 रुपये प्रति लिटर झाले आहे. या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात उच्चांक गाठला आहे.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटो...

बातम्या आणखी आहेत...