आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 व्या वर्षी थेट पुरस्काराची मानकरी; जागतिक स्तरावर कुशाग्र बुद्धीची साक्ष

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अाैरंगााबाद- अाैरंगाबादच्या वुमन इंटरनॅशनल मास्टर्स साक्षी चितलांगेने राज्यातील प्रतिष्ठेचा ‘शिवछत्रपती’ क्रीडा पुरस्काराचा बहुमान पटकावला. या पुरस्कारासाठी निवड झालेली साक्षी ही महाराष्ट्रातील सर्वात युवा खेळाडू ठरली. तिने वयाच्या १५ व्या वर्षी २०१४-२०१५ साठी देण्यात येणारा पुरस्कार पटकावला. जागतिक स्तरावर अापल्या कुशाग्र बुद्धीची साक्ष पटवून देणाऱ्या बुद्धिबळपटू साक्षीची या पुरस्कारासाठी थेट निवड झाली हाेती. तिला अाता १७ फेब्रुवारी राेजी या पुरस्काराने गाैरवण्यात येईल. तिची अांतरराष्ट्रीय  कामगिरी उल्लेखनीय ठरली अाहे.  


सर्वात युवा मानकरी : राज्यात अातापर्यंतच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये साक्षी ही सर्वात युवा असल्याचे दिसते. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुकलरने वयाच्या १७ व्या वर्षी क्रिकेटमधील उल्लेखनीय याेगदानाबद्दल हा पुरस्कार पटकावला हाेता.    सुनील गावसकरही वयाच्या २२ व्या वर्षी या पुरस्काराचे मानकरी ठरले. अाता यात साक्षीने वयाच्या १५ व्या वर्षी बाजी मारली.  
क्वीन  साक्षीने अवघ्या चार वर्षांच्या अांतरराष्ट्रीय स्तरावरच्या प्रवासात घवघवीत यश संपादन केले. तिने वयाच्या १४ व्या वर्षी वर्ल्ड वुमन अमॅच्युअर चेस चॅम्पियनशिप अापल्या नावे करण्याचा पराक्रम तिने गाजवला. या स्पर्धेतील तिचे हे पहिले अांतरराष्ट्रीय पदक ठरले. ती यात सुवर्णपदकाची मानकरी ठरली हाेती. बाप-लेकीने मारली बाजी : बुद्धिबळच्या खेळात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या साक्षी अाणि तिचे वडील दिनेश चितलांगे या दाेघा बाप-लेकीने राज्य शासनाच्या पुरस्कारामध्ये बाजी मारली.साक्षीला २०१५ च्या पुरस्काराने गाैरवण्यात येणार अाहे.तसेच िदनेश यांची उत्कृष्ट मार्गदर्शक पुरस्कारासाठी निवड झाली. 

 

विभागात पुरस्कार विजेती पहिली बुद्धिबळपटू 
साक्षीने अल्पावधीत अांतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत वेगळा ठसा उमटवला. उल्लेखनीय कामगिरीमुळेच थेट राज्यातील प्रतिष्ठेच्या शिवछत्रपती  पुरस्कारासाठी तिची निवड झाली. यासह तिने या विभागात मिळवलेले यश एेतिहासिक ठरले. कारण  हा राज्य क्रीडा पुरस्कार पटकावणारी ती अाैरंगाबाद विभागातील पहिली बुद्धिबळपटू ठरली. अातापर्यंत १९७९ पासून ते अाजतागायत अाैरंगाबाद विभागात या खेळातील खेळाडूचा या पुरस्काराने गाैरव झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...