आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरधाव वेगातील जीपची दुचाकीस जोरदार धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- भरधाव वेगातील जीपने दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार संजय चव्हाण जागीच ठार झाले. सिल्लोड अजिंठा रस्त्यावर  पालोद (ता.सिल्लोड) फाट्यावर सोमवार दि.१९ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अपघात झाला. अजिंठ्याकडून सिल्लोडकडे येणारी  जीपने(एमएच.२०.सीएस १७०४) पालोद फाट्यावर सिल्लोडकडून खंडाळा येथे जाणारे दुचाकीस्वार संजय भावराव चव्हाण यांच्या दुचाकीला(क्र. एमएच.२०.एपी. ४७६५)  जोरदार धडक दिली. 


या अपघातात  संजय भावराव चव्हाण (४५) रा.खंडाळा (ता.सिल्लोड) हे जागीच ठार झाले. अपघातानंतर जीप चालक पळून गेला. अपघातस्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाध घेतली. अपघाताची सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद घेण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...