आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा आहे महाराष्ट्राचा पॅडमॅन, 5 वर्षांपासून गावागावात जाऊन देतोय पॅड बनवण्याचे आरोग्य शिक्षण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/बीड-  आज रिलीज झालेल्या अक्षय कुमारच्या पॅडमॅन या चित्रपटाची कथा अरुणाचल मुरुगन्थम यांच्यावर आधारित आहे. पण आज आम्ही तुम्हाला बीड जिल्ह्यातील  पाचेगावकर दाम्पत्याची माहिती देणार आहोत. मुरुगन्थम यांना उशीरा का होईना प्रसिद्धी मिळाली. समाजात त्यांच्यासारखे अनेकजण काम करत असतात. मात्र त्यांना प्रसिद्धी मिळत नाही किंवा आपण किती मोठे काम करतो आहे, याची जाणीवदेखील नसते. 
 
 
 
ग्रामीण भागातील किशोरवयीन मुली आणि महिलांनी मासिक पाळीच्या वेळी आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या दिवसांत सॅनेटरी नॅपकिनचाच वापर कसा करावा याविषयी गाव, शाळा, वस्ती अाणि तांड्यावर जनजागृती करण्याचे काम औरंगाबादमधील एक दाम्पत्य गेल्या पाच वर्षांपासून करत आहे.
 
 
मासिक पाळी या विषयावर आपल्याकडे बोलण्यासही बंदी आहे, त्यामुळे त्या काळातील स्वच्छता ही तर दुर्लक्षिलेलीच बाब, पण एका पुरुषाच्या दक्षतेमुळे त्यांनी स्त्रियांसाठी विशेषत: खेडय़ातल्या स्त्रियांसाठी स्वस्त आणि उपयोगी सॅनिटरी नॅपकिन्स तयार केले आहेत. त्यानिमित्ताने त्याने अनेक स्त्रियांना रोजगारही मिळवून दिला. किशोर पाचेगावकर आणि सीमा पाचेगावकर असे या दाम्पत्याचे नाव आहे. मातोश्री प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून ते गावोगावी जाऊन ते याविषयी मार्गदर्शन करतात.
 
 
अशी झाली संस्थेची सुरुवात
संस्थेचे सचिव मूळ बीड जिल्ह्यातील पाचेगाव येथील रहिवाशी आहेत. 2013 मध्ये बीडमधील काही भागात कित्येक महिलांचे गर्भपिशवीचे ऑपरेशन झाले होते. ही बातमी कळताच दाम्पत्याने शस्त्रक्रिया झालेल्या महिलांची भेट घेतली. या महिला 30 ते 35 वयोगटातील होत्या. आर्थिक परिस्थितीमुळे या महिला झाडाची पाने, सिमेंटच्या गोण्या, पेपरचा वापर करतात. त्यामुळे त्यांना हा आजार झाला. मन पिळवटून टाकणाऱ्या या गोष्टीने ते अस्वस्थ झाले आणि तेव्हाच नॅपकिन मोफत वाटण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या अभियानाला त्यांनी ‘सॅनेटरी महाअभियान’ असे नाव दिले आहे.
 
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...