आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल न दिल्याच्या कारणावरून तिघांना मारहाण, पाच जणांना दंड अन् शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर- मोबाइल न दिल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील तिघांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही.आर. जांभुळे यांनी भिवगाव (ता. वैजापूर) येथील पाच जणांना प्रत्येकी एक हजार रुपये दंड व कोर्ट संपेपर्यंत बसण्याची शिक्षा सुनावली. अप्पासाहेब यशवंत तुपे, सूर्यकांत अप्पासाहेब तुपे, चंद्रकांत अप्पासाहेब तुपे, अलका अप्पासाहेब तुपे व संगीता अप्पासाहेब तुपे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. तालुक्यातील परसोडा येथे १ जून २०१७ रोजी ही घटना घडली होती. परसोडा येथे आठवडी बाजारात रावसाहेब तुपे यांच्या मुलाने शंकर यांना मोबाइल मागितला होता. पण मोबाइल न दिल्याने आरोपींनी शंकर व त्यांची पत्नी व मुलाला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. 


याप्रकरणी आरोपींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलिस उपनिरीक्षक पी.पी. राठोड यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीच्या वेळी सरकारी वकील आनंद वैष्णव यांनी सात जणांची साक्ष घेतली. आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने प्रथम वर्ग न्यायाधीश व्ही.आर. जांभुळे यांनी सर्व आरोपींना चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र व शांतता राखण्याच्या अटीवर प्रत्येकी एक हजार रुपये दंड व कोर्टाचे कामकाज संपेपर्यंत बसण्याची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी हेड कॉन्स्टेबल एच.एस. सिरसाठ व धनंजय भावे यांनी सहकार्य केले. 

बातम्या आणखी आहेत...