आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलंब्री नगर पंचायतीसाठी आज मतदान; प्रशासन सज्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रशासनच्या वतीने आज शहरात शालेय विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली. - Divya Marathi
फुलंब्री नगर पंचायतीच्या निवडणुकीत मतदान करण्यासाठी प्रशासनच्या वतीने आज शहरात शालेय विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली.

फुलंब्री- आगामी फुलंब्री नगर पंचायतीच्या पहिल्या ऐतिहासिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. १३) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार अाहे. नगर पंचायत कार्यक्षेत्रातील १४ हजार १२४ मतदार १७ ठिकाणी असलेल्या मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती सहायक निवडणूक अधिकारी तथा फुलंब्री नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी दिली. 


फुलंब्री नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून जिल्हा सरचिटणीस सुहास शिरसाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या फुलंब्री विकास आघाडीकडून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी शिरसाठ ठोंबरे यांच्यातील लढत चुरशीची ठरणार अाहे. फुलंब्री नगर पंचायतीच्या पहिल्या नगराध्यक्ष पदाचा पहिला मान कुणाला मिळतो हे गुरुवारी निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. उर्वरित १७ सदस्यांच्या जागांसाठी ४५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यात भाजपचे १७, आघाडीचे १७, एम.आय.एम. २, रिपाइं (डी)२ आणि जागांवर अपक्ष उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 


चोख पोलिस बंदोबस्त 
फुलंब्रीनगर पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी केंद्राध्यक्ष १७, मतदान अधिकारी ५१, शिपाई १७, पोलिस कॉन्स्टेबल १७ तैनात केले आहेत. याशिवाय पोलिस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. 

बातम्या आणखी आहेत...