आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा दरात पाच दिवसांत 800 रुपयांची घसरण; अावक माेठ्या प्रमाणात वाढल्याने दरावर परिणाम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लासलगाव- कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी झालेल्या लिलावात कांद्याच्या दरात सुमारे २६३ रुपयांची घसरण पहायला मिळाली. डिसेंबर महिन्यापासून कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढूनही भाव स्थिर होते. मात्र, गेल्या पाच दिवसांत लासलगावसह जिल्ह्यातील इतरही बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार भावात ८०० रुपयांची घसरण झाली आहे. 


मंगळवारी लासलगाव बाजार समितीत विक्रीसाठी अालेल्या लाल कांद्याला सर्वाधिक ३४६३ रुपये भाव मिळाला होता. त्याच लाल कांद्याला बुधवारी सरासरी ३२०० क्विंटल असा रुपये भाव मिळाला. सरासरी कांद्याचे भाव २७५० रुपये होते. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज १८ ते २० हजार क्विंटलची अावक होत आहे. 


डिसेंबर महिन्यात लाल कांद्याला सुमारे चार हजार रुपयांपर्यंत भाव मिळाले होते. जानेवारी महिन्यात कांद्याच्या भावात काहीशी घसरण होताना पहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त हाेत अाहे. सध्या नाशिक जिल्ह्यातील विविध बाजार समितीमध्ये लाल कांद्याला यावर्षी पहिल्यांदाच चांगले भाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग आपला शेतीमाल लवकर चांगल्या भावात विक्री व्हावा या हेतूने बाजार समितीत कांदा विक्री करण्यासाठी अाणत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...