आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​प्राचार्यांचे शिष्टमंडळ म्हणाले- आम्ही परीक्षा घेण्यास असमर्थ, कुठलेही सहकार्य करणार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- एमआयटीच्या नर्सिंग महाविद्यालयातील आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याची कॉपी पकडली म्हणून गुन्हे दाखल केलेल्या प्राचार्यांच्या समर्थनार्थ सर्वच महाविद्यालयांतील प्राचार्यांनी आता एकजूट दाखवली. गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतल्यानंतर सर्व प्राचार्यांनी आता आपला मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे वळवला आहे. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांना सोमवारी (१६ एप्रिल) प्राचार्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. यापुढे विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास आपण असमर्थ असून कुठल्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असे सांगण्यात येणार आहे. सध्या पदव्युत्तर पदवी आणि पुढील महिन्यात अभियांत्रिकी विषयाच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे प्राचार्यांनी परीक्षांवर बहिष्कार पुकारला तर विद्यापीठासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...