आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिक अभ्यासक्रमात शहिदांच्या वारसांना प्राधान्य; आरक्षणाची नव्याने क्रमवारी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- सैन्यातील जवानांच्या पाल्यांसाठी व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश देण्यासाठी आरक्षणाचा नव्याने क्रम केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने ठरवून दिला आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग यासह केंद्र व राज्यांच्या विविध शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी कारवाईत आता शहीद झालेल्या सैन्यातील जवान, कनिष्ठ कमिशन अधिकारी अथवा कमिशन अधिकारी यांची विधवा पत्नी अथवा पाल्यास प्राधान्य देण्याची अधिसूचना काढण्यात आली आहे. देशविघातक कारवाईत अपंगत्व आलेल्या कारणावरून सैन्यातून निवृत्त झालेल्या पाल्याचाही विचार आरक्षणासाठी केला जावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत.       


केंद्रीय संरक्षण विभागाने प्राधान्यक्रम ठरवताना कारवाईत शहीद झालेल्या जवानास प्राधान्य दिले आहे. यात सेवेत अपंगत्व आलेल्या जवानाचे पाल्य,  मृत जवानाची विधवा अथवा पाल्य, सैन्यातून आजारपण अथवा इतर कारणाने बोर्ड आऊट झालेल्या जवानाचे पाल्य, विविध युद्ध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांच्या पाल्य, माजी सैनिकांची पाल्य, सेवेत असताना अपंगत्व आलेल्या जवानाची पत्नी, सेवेतील जवानांचे पाल्य किंवा पत्नीचा विचार करण्यात येणार आहे. माजी सैनिकांसंबंधीचे प्रमाणपत्र प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण विभागातर्फे दिले जाते.  तर सेवेत असलेल्या जवानाचे  प्रमाणपत्र संबंधित विभाग देतात. यापूर्वी अभ्यासक्रमासाठीच्या आरक्षणासाठी अशा प्रकारे  कॅटेगरी पाडण्यात आली नव्हती. महाराष्ट्रात माजी सैनिक आणि सेवेतील सैनिक अशीच कॅटेगरी होती. केंद्राने आता सैन्यातून बाहेर पडणाऱ्या सैनिकांची संख्या लक्षात घेता असा प्रकारची प्राथमिकता ठरवून दिली. देशभरात लष्करातून दरवर्षी साठ हजार जवान , कनिष्ठ अधिकारी आणि अधिकारी निवृत्त होतात.


वैद्यकीयसह पाच अभ्यासक्रमाचा समावेश
सैन्यातील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी ५ जागा विविध अभ्यासक्रमांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महापालिका महाविद्यालय, शासकीय मदतीवर चालणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयात दंत महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय, युनानी आणि काही आरोग्य शास्त्राच्या अभ्यासक्रमांचा यात समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...