आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रोझोन सेक्स रॅकेट प्रकरण: स्पामालक पोलिसांना सापडेनात; मॉल प्रशासनाला क्लीन चिट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहर पोलिसांनी प्रोझोन मॉलमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर धाड मारत हा अड्डा उद््ध्वस्त केला. मॉलमधील फॅमिली स्पाच्या नावाखाली हा प्रकार सुरू होता. मात्र स्पाचे मालक अजून पोलिसांना सापडले नाहीत. त्यामुळे या रॅकेटचा मुख्य सूत्रधार नेमका कोण आहे हे समोर आलेले नाही. एकीकडे भाषेची अडचण येत असल्यामुळे तपास धिम्या गतीने सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, शनिवारी ताब्यात घेतलेल्या पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकून वेश्याव्यवसाय उघडकीस आणण्यात आला होता. आरोपींना ११ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर थायलंड येथील पीडित मुलींना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. या हायप्रोफाइल सेक्स रॅकेटमागे नेमके कोण आहे हे शोधण्यात पोलिसांना अजून यश आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्पाचे मालक मुंबईत राहत असून फैजान शेख आणि डेरिक मचदो अशी त्यांची नावे आहेत. शेट्टी नावाच्या व्यक्तीचाही यात समावेश असल्याचा संशय आहे. मात्र पोलिस याबाबत काहीही बोलण्यास तयार नाहीत. 


या प्रश्नांची उत्तर सापडेनात
एन-१ मधील ज्या अालिशान फ्लॅटमध्ये या मुली राहायच्या तो कोणाचा आहे, टुरिस्ट व्हिसावर येणाऱ्या या मुलींची पोलिस आयुक्तालयातील संबंधित विभागाकडे का नोंद नाही, या मुलींना शहरात नेमके कोण आणत होते, मॉल प्रशासनाला नेमकी याची काहीच कल्पना कशी नव्हती, एकाच वेळी महिला पार्लरसाठी येत असताना हा व्यवसाय कसा सुरू होता. तीन वर्षापासून हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा आहे, मग पोलिसांना याबाबत माहिती का मिळाली नाही, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप सापडलेली नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...