आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे तोडणाऱ्यांना लिंब, वडाची दहा झाडे लावून जगवण्याची शिक्षा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शेतातील बोर आणि भोकरीचे झाड तोडण्यावरून दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी सोमवारी सात जणांना दोषी ठरवून गावात येणाऱ्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला प्रत्येकी लिंबाची वडाची झाडे लावण्याची शिक्षा सुनावली. पोलिसांनी प्रत्येक सहा महिन्याला या झाडांची पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. 


सहा महिन्यांत वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्यात सात जण अयशस्वी ठरले तर त्यांना तीन वर्षांची सक्तमजुरी सुनावली जाईल, अशी तंबीही न्यायालयाने दिली आहे. पैठण खेडे (ता. पैठण) येथील अशोक ऊर्फ अण्णा परमेश्वर घुले अशोक नारायण घुगार्डे (४५) यांची खळेवाडी शिवारात शेती आहे. शेतीच्या मालकी हक्कावरून दोघांत नेहमी भांडण होत असे. 


१९ ऑक्टोबर २०१५ रोजी घुगार्डे यांनी शेतातील बोराचे आणि भोकरीचे झाड तोडले. त्यावरुन दोघांत कडाक्याचे भांडण झाले. योगेश, अशोक, विनोद, दीपक घुगार्डे यांनी घुले लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली. परस्परविरोधी तक्रारीवरून बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले. अतिरिक्त सरकारी वकील सतीश मुंडवाडकर यांनी साक्षीदार तपासले. दुसऱ्या गुन्ह्यात सहायक लोकाभियोक्ता उदय पांडे यांनी साक्षीदार तपासले. 


पाेलिसांनी अहवाल सादर करावा 
न्यायालयानेसातही आरोपींना दोषी ठरवले. मात्र चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर सोडण्याचे आदेश देत काही अटी घालून दिल्या. आरोपींनी गावात येणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस प्रत्येकी लिंबाचे आणि वडाची, तर दुसऱ्या बाजूस प्रत्येकी वडाची आणि लिंबाची झाडे लावून देखभाल करावी. बिडकीन पोलिसांनी प्रत्येक सहा महिन्यांनी त्या झाडाची पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. 

बातम्या आणखी आहेत...