आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राधाकृष्ण विखेंनी मतदारांना आर्थिक प्रलोभन दाखवले’; याचिकाकर्त्याचा जबाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आैरंगाबाद- विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभा निवडणूक २००९ मध्ये मतदारांना पैशांचे अामिष दाखवल्याचा जबाब मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात दाखल याचिकेत सुरू असलेल्या उलटतपासणीत याचिकाकर्त्यांनी दिला. खंडपीठात अॅड. एस. एम. गोडसे यांनी याचिकाकर्ते एकनाथ घोगरे यांची उलटतपासणी घेतली. 


शिर्डी विधानसभा मतदारसंघ निवडणुकीत विखे यांनी मतदारांना विविध प्रलोभने दाखवली. भ्रष्ट मार्गाचा अवलंब केल्याचे उलटतपासणीत सांगण्यात आले. विखे स्वत: शिक्षणमंत्री होते आणि त्यांच्या पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा हाेत्या. ऐन निवडणुकीच्या काळात आचारसंहितेची तमा न बाळगता स्वत:च्या अधिपत्याखालील प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्यावर राज्यपातळीवरील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले. या समारंभाचे निमंत्रण असूनही तत्कालीन मुख्यमंत्री गैरहजर राहिले. कारखान्याच्या माध्यमातून उसाच्या पेमेंटच्या नावाखाली अनधिकृत पेमेंट वाटले गेल्याचे सांगण्यात आले. याचिकाकर्त्याच्या वतीने अॅड. प्रशांत कातनेश्वरकर, अॅड. विक्रम उंदरे यांनी काम पाहिले. विखेंच्या वतीने अॅड. एस. एम. गोडसे यांनी बाजू मांडली. पुढील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...