आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई सुंदरी बनवण्याचे आमिष दाखवून १० वर्षे तरुणीवर बलात्कार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अभिनेत्री बनवतो, हवाई सुंदरी बनवतो असे आश्वासन देऊन अखिल भारतीय सेनेच्या पदाधिकाऱ्याने २६ वर्षीय तरुणीवर दहा वर्षांपासून अत्याचार करत तब्बल दहा वेळा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून क्रांती चौक पोलिस ठाण्यात दिलीप सुदाम सुतार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी दिलीप व पीडितेची अकरावीत असताना ओळख झाली होती. त्याने तिच्या कुटुंबीयांचा देखील विश्वास संपादन केला. माझ्या खूप ओळखी आहेत, असे सांगून मुंबईत चित्रपटामध्ये अभिनेत्रीचे काम मिळवून देतो किंवा हवाई सुंदरीच्या कोर्सला प्रवेश देऊन नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले. त्यानुसार तिला २० जून २००८ रोजी पहिल्यांदा लोणावळा येथे नेले. काळेवाडीतील एका हॉटेलात नेऊन शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर अत्याचार केला. तसेच तिची नग्न छायाचित्रे काढली.

बातम्या आणखी आहेत...