आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांच्या व्हॉट्सअॅपवर तक्रार, दहा ट्रक वाळू जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्हाधिकाऱ्यांनी सहा दिवसांपूर्वी ७९७२९८३१९७ हा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केल्यानंतर नागरिकांच्या सहा दिवसांत तब्बल दीड हजार तक्रारी आल्या आहेत. यामध्ये १२०० पेक्षा अधिक तक्रारी शहरातल्या स्वच्छता, कचरा, पाण्याचा प्रश्न यासंदर्भातल्या आहेत. तर शहरात पुंडलिकनगर पोलिस स्टेशनजवळील मैदानात वाळूसाठ्याबाबत नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रारदेखील करण्यात आली. त्यानंतर बुधवारी तहसीलदारांनी तब्बल दहा ट्रक वाळू जप्त केली. मात्र महसूलच्या अधिकाऱ्यांनी वाळू जप्त करताना वाळू कोणाची आहे हे सांगण्यास कोणीही पुढे आलेले नाही.

 
सर्वसामान्यांना अनेकदा त्यांची तक्रार कुठे करावी, ती सुटेल की नाही याची माहिती नसते. विशेषत: ग्रामीण भागात तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा व्हॉट्सअॅप क्रमांक जाहीर केल्यानंतर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात प्रामुख्याने सफाईविषयीच्या तक्रारी आहेत. 


पुंडलिकनगर पोलिस स्टेशनच्या बाजूच्या मैदानात मोठ्या प्रमाणात वाळू होती. या विषयी तक्रार आल्यावर तहसीलदार रमेश मुंडलोड यांच्या पथकाने प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. या वेळी दहा ट्रक वाळू ताब्यात घेण्यात आली. मात्र तहसीलदारांनी ही वाळू कोणाची आहे हे विचारल्यानंतर कोणीही वाळू आमची आहे हे सांगण्यास पुढे आले नाही. 


खराब रस्त्याच्या तक्रारी 
ढोरकीनआणि ढाकेफळ रस्त्याबाबत तक्रारी आल्या आहेत. गेल्या तीन वर्षांपासून हा रस्ता दुरुस्त झाला नसल्याचे फोटो नागरिकांनी टाकले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात लोकांच्या काय समस्या आहेत हेदेखील या माध्यमातून पुढे येत आहे. 

बातम्या आणखी आहेत...