आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा समाजाचे प्रश्न 31 डिसेंबरपर्यंत मार्गी लावा; राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठा आरक्षण, केजी टु पीजी मोफत शिक्षण, वसतिगृह, शेतमालाला उत्पादन खर्च वजा जाता ५० टक्क्यांवर हमी भाव यासह विविध मागण्यांची आजही सरकारने पूर्तता केलेली नाही. यामुळे सकल मराठा समाज संतप्त झाला असून उद्रेक होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तत्पूर्वी सरकारला शेवटची संधी म्हणून ३१ डिसेंबरपर्यंत अधिवेशनात मराठा समाजाच्या प्रश्नावर ठोस निर्णय घ्यावेत, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल. त्यापूर्वी काही आंदोलने झाली तर त्यास सरकारच जबाबदार असेल, असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी पत्रकार परिषदेतून दिला आहे. 


मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ५८ मूक मोर्चे काढले आहेत. ऑगस्ट २०१७ रोजी राज्य सरकारने सर्व प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही दिली होती. नोव्हेंबरला महसूलमंत्री तथा आरक्षण उपसमितीचे उपसचिव चंद्रकांत पाटील औरंगाबादेत आले असता मराठा समन्वयकांनी त्यांची भेट घेऊन जाब विचारला असता त्यांनी १४ नोव्हेंबरला मुंबईला बोलावले. सह्याद्रीवर बैठक झाली. त्यानंतर २१ २८ नोव्हेंबरलादेखील बैठक घेण्यात आली. त्यामध्ये १४ शासन आदेश काढल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यामध्ये ६४ चुका करून ठेवल्या आहेत. १७ डिसेंबर रोजी मुंबई येथे मराठा आरक्षण विषयावर दुपारी वाजता तज्ज्ञांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता चंद्रकांत पाटील यांच्या सोबत बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणाचे अभ्यासकांना सहभागी करावे. सरकारने दिलेल्या ग्वाहीची ३१ डिसेंबरपर्यंत अंमलबजावणी व्हावी. त्यानंतर आंदोलन केले जाईल. 


१८ डिसेंबर रोजी अधिवेशनावर मोर्चा 
अधिवेशनांना मराठा समाजाच्या सर्व प्रश्नावर निर्णय घ्यावा, उक्तीप्रमाणे डेडलाइनप्रमाणे ठोस कृती करावी, मराठा आरक्षणाचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, यासह विविध प्रश्न सोडवावे, नियमबाह्य उपसमिती रद्द करावी, यासाठी काही मराठा समन्वयक १८ डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. गत वर्षी मोर्चा दडपण्याचा सरकारने केविलवाणा प्रयत्न केला होता पण तो आम्ही आणून पाडला होता, तसे प्रयत्न आता करू नये. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...