आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ्या बाजारात जाणारा पाटोदा येथील तांदूळ पकडला; औरंगाबाद पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिडकीन- स्वस्त धान्य दुकानात वितरित केला जाणारा तांदूळ खरेदी करून काळ्या बाजारात चढ्या भावाने विकण्यासाठी नेला जात असताना औरंगाबाद ग्रामीण  गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला.  

 

 बीड जिल्ह्यातील पाटोदा येथून धुळे जिल्ह्यात चोरट्या मार्गाने शासकीय तांदूळ विक्री करण्यासाठी बिडकीन मार्गे आयशर गाडीत  जात असल्याची गुप्त माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सचिन कपुरे यांनी आपल्या पथकासह बिडकीन-पैठण रोडवरील साई मंदिराजवळ सापळा रचला. याच वेळी औरंगाबादच्या दिशेने जाणारा एमएच १६ क्यू ५२४५ हा आयशर संशयास्पद दिसून आला. या वेळी गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित गाडी थांबवून चौकशी केली असता २००  गोण्या तांदूळ आढळून आला. हा तांदूळ चोरट्या मार्गाने विक्रीसाठी जात होता. दोन लाख रुपये किमतीचा तांदूळ असल्याची माहिती  पोलिसांनी दिली. चोरीचा तांदूळ पकडल्यानंतर याची माहिती पैठण महसूल विभागाला देण्यात आली. त्यानंतर नायब तहसीलदार नानासाहेब फोलाणे यांनी बिडकीन येथे येऊन शासकीय तांदूळ असल्याची शहानिशा करून पंचनामा केला  याप्रकरणी पोलिसांनी एक आरोपी ताब्यात घेतला असून बिडकीन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधीक्षक वणकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि.भुजंग, पोलिस उपनिरीक्षक सचिन कपुरे, गणेश मुळे, गणेश जाधव , नदीम शेख , दीपक देशमुख यांनी केली. पुढील तपास बिडकीन पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पंडित सोनवणे करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...