आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील दंगल राजकीय हेतूनेच; पाहणीनंतर सत्यशोधन समितीने केला आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- शहरातील दंगली हिंदू-मुस्लिम नव्हतीच. आजही सामाजिक सलोखा कायम आहे. मात्र, राजकीय आणि आर्थिक हेतूने प्रेरित होऊन दंगल घडवण्यात आली. हिंदूंना मुस्लिमांची भीती दाखवून हिंदूंचे संरक्षण शिवसेनाच करू शकते, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप दंगलीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या सत्यशोधन समितीने सोमवारी पत्रपरिषदेत केला. 

 

सेंटर फॉर स्टडी ऑफ सोसायटी अँड सेक्युलरिझम (सीएसएसएस) आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला. आहे. "सीएसएसएस'चे संचालक अॅड. इरफान इंजिनिअर, सहसंचालक नेहा दाभाडे, सिद्धी पेंडके, अॅड. अभय टाकसाळ, बुद्धप्रिय कबीर, अश्फाक सलामी यांच्या समितीने दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. 


हप्तेखोरी दंगलीस कारणीभूत
गेल्या पंधरा दिवसांपासून विविध कारणांनी दंगल घडवण्याचा प्रयत्न होता. शिवसेना व्यापारी आघाडी व माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या मागणीवरून फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई झाली. लच्छू पहिलवान फेरीवाल्यांकडून हप्ते घेत होता. बेकायदा नळ तोडण्याची कारवाई केवळ मुस्लिमांच्या विरोधात झाली. शहागंजमधील मीना बाजारला शिवसेनेचा विरोध आहे. हे सर्व मुद्दे आर्थिक व राजकीय स्वरूपाचे आहेत. ११ मे रोजी मुस्लिम व वाल्मीकी समाजाच्या तरुणांचा झालेला वाद हा वैयक्तिक असताना त्याला धार्मिक स्वरूप देऊन दंगल घडवण्यात आली, असा दावा या वेळी करण्यात आला. दरम्यान, दंगलीत नुकसान झालेल्या नागरिकांना मदत करून व्यापाऱ्यांचे पुनर्वसन करावे, राजकीय नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...