आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम कार्डद्वारे पावणेदाेन लाखांना गंडा; कार्डचे क्लोन करून लांबवली रक्कम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- एटीएमच्या अाधारे पैसे काढण्यास मदत करण्याची भासवत भलतेच कार्ड देऊन एका ग्राहकाच्या बँक खात्यातून ९५ हजारांची रक्कम काढत त्याच एटीएम कार्डचे क्लोन तयार करून बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करून एक लाख ७५ हजार रुपये काढण्याचा प्रकार म्हसरूळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेत उघडकीस आला. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


याप्रकरणी हरिश्चंद्र जानू पालवी यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार सप्टेंबर महिन्यात सकाळी ११ वाजेच्या सुमारास म्हसरूळ येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पैसे काढण्यास गेले होते. येथे दोन अनोळखी व्यक्तींनी पैसे काढण्यास मदत केली. कार्ड परत देताना भलतेच कार्ड दिले. काही दिवसांनी खात्यातून ९५ हजार म्हसरूळ शाखा, जव्हार शाखा, निशीनगर (हिसार), तसेच गुजरात येथील शाखेमार्फत पालवी यांच्या खात्यात ४० हजार, ८० हजार रुपये ट्रान्सफर करत पालवी यांच्या बँक खाते असलेल्या शाखेतून काढून घेतले. दिलेले कार्ड भलत्याच माणसाचे असल्याचे एटीएममध्ये पैसे काढण्यास गेल्यानंतर पालवी यांच्या निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर बँक व्यवस्थापनेकडून पोलिसांत तक्रार देण्याचा सल्ला दिला. पालवी यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेले प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य घेत गुन्हा दाखल केला. सहायक निरीक्षक वाल्मीक शार्दुल अधिक तपास करत आहेत. 


कार्डचे क्लोन बनवत अपहार करणारी टोळी 
काही दिवसांपूर्वी अशाचप्रकारे बँकेच्या एटीएम कार्डचे क्लोन बनवत देश-विदेशात परस्पर पैसे काढल्याचे प्रकार घडले होते. सायबर पोलिसांनी नोएडा येथील टोळीसह एका नायजेरियन नागरिकास अटक केली होती. यानंतर हा प्रकार घडल्याने ही टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे या घटनेतून समोर आले आहे.

बातम्या आणखी आहेत...