आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीच्या बालरोग विभागात स्फोटाच्या अफवेमुळे धावपळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- घाटीच्या बालरोग विभागाच्या वॉर्ड २४ मध्ये शनिवारी (९ डिसेंबर) दुपारी १२ वाजेच्या सुमारास आॅक्सिजन सिलिंडर बदलताना आवाज झाला. मात्र, अचानकपणे झालेल्या या आवाजामुळे नातेवाईक घाबरले आणि पळत सुटले. त्यामुळे अचानक झालेल्या पळापळीमुळे घाटीत भीतीचे वातावरण पसरले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाणे आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेतली होती. 


बालरोग विभागाच्या वॉर्ड क्रमांक २४ मध्ये व्हेंटिलेटरचे आॅक्सिजन सिलिंडर बदलले जात होते. सिलिंडर बदलताना आवाज होत असतो. मात्र, आजचे सिलिंडर बदलताना नेहमीपेक्षा मोठा आवाज झाला. शिवाय आजूबाजूच्या रुग्णांच्या नातेवाइकांपैकी काहींनी प्रथमच असा आवाज ऐकला. त्यामुळे स्फोटाची भीती पसरली. या वेळी एका नातेवाइकाने स्फोट झाल्याची आरडाओरड करीत बाहेर धाव घेतली. हे पाहून इतरांनीही त्याच्यापाठोपाठ धाव घेतली. याविषयी माहिती मिळताच डॉक्टरांनी, सुरक्षा रक्षकांनी वॉर्डात धाव घेतली. या वेळी त्यांनी नातेवाइकांची समजूत काढत परिस्थिती नियंत्रणात आणली. बाहेर आलेल्या सर्व रुग्णांना पुन्हा वॉर्डात दाखल केले. या प्रकारामुळे घाटीत दिवसभर घबराटीचे वातावरण होते. 

बातम्या आणखी आहेत...