आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अधर्मीयांसाठी भगवा दहशतवाद अनिवार्य : साध्वी प्रज्ञासिंह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई अधर्मीयांच्या विरोधात होती. त्यांच्या महान कार्याची शिकवण देशहितासाठी सर्वांनी आत्मसात करावी. अधर्मीयांच्या विनाशासाठी भगवा दहशतवाद अनिवार्य असल्याचे साध्वी प्रज्ञासिंह यांनी रविवारी पत्रकार परिषदेत सांगितले. 


राष्ट्रहित जनाधार विश्वस्त मंडळाच्या वतीने कै. जनुभाऊ रानडे यांचा दहावा स्मृतिदिन व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त "भगवा रंग त्यागाचा' या विषयावर सोमवारी सकाळी ११ वाजता संत तुकाराम नाट्यगृहात साध्वी प्रज्ञासिंह यांचे व्याख्यान होणार आहे. त्यासाठी त्यांचे शहरात आगमन झाले आहे. तत्पूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, मणका आणि गळ्याचा आजार असल्यानेडॉक्टरांनी बोलण्यास मनाई केली आहे. तरी महत्त्वाचा दिवस असल्याने मी उपस्थित राहिले. 

 

देशहितासाठी काम करणाऱ्यांना कुणीच जास्त काळ दाबून ठेवू शकत नाही. राजकारणात प्रवेशाविषयी विचारले असता भविष्यात जे काही समोर येईल, त्यावर योग्य वेळी निर्णय घेईन, असे सांगत जास्त बोलणे टाळले. या वेळी विहिंपचे देवगिरी प्रांत अध्यक्ष संजय बारगजे, मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव शेरकर, सचिव राजीव जहागीरदार आदी उपस्थित होते. 


राम मंदिर होणारच...
मी बाबरी मशीद पाडायला गेले होते. आता राम मंदिर निर्माणासाठी उपस्थित राहीन. विरोधक अडचणी आणताहेत, पण त्यावर मात करून राम मंदिर उभारले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी चांगले काम करत असल्याचे सांगत प्रवीण तोगडियांच्या प्रकरणावर मात्र बोलण्याचे टाळले.

बातम्या आणखी आहेत...