आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 कोटी हप्तेखोरीचा माजी पीआय वाळू ठेकेदाराचा पोलिसांवर आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- वाळू वाहतूकदार हे माफिया नसून व्यापारी आहेत. मात्र, पोलिस आणि महसूल प्रशासनाकडून त्यांना त्रास दिला जातो. औरंगाबादमध्ये एक वाळू वाहतूकदार महिन्याकाठी दोन लाख रुपये हप्ता पोलिसांना देतो. जिल्ह्यात २०० वाळू वाहतूकदार महिन्याकाठी कोटी रुपये हप्ता पोलिसांना देतात, असा आरोप महाराष्ट्र वाळू वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष आणि पोलिस निरीक्षकपदावरून निवृत्त झालेले अधिकारी भाऊसाहेब आंधळकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. मात्र, याबाबत कोणतेही पुरावे देण्यास तसेच अधिकाऱ्यांची नावे सांगण्यास आंधळकर यांनी नकार दिला आहे. 


महाराष्ट्र राज्य वाळू वाहतूकदार संघटनेने पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात भू्मिका मांडण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विशेष म्हणजे सध्या निवृत्त असलेले आंधळकर यांनी पुण्यात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. १४ डिसेंबरला गुरुवारी क्रांती चौक ते विभागीय आयुक्तालयावर पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या विरोधात वाळू वाहतूकदारांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता हा मोर्चा निघणार असून राज्यातील हजारांपेक्षा अधिक वाळू वाहतूकदार यामध्ये सहभागी होणार आहेत. 


वाळू वाहतूकदार ठेकेदाराकडून वाळू विकत घेतात. अवैध उत्खनन करणाऱ्यांविरोधात उर्वरितपान.६ कारवाईकेली जात नाही. वाळूपट्टे लिलावात नाही गेले आणि तरीही उत्खनन होत असेल तर ठेकेदार, त्या भागातला पोलिस अधिकारी तसेच संबंधित तहसीलदारावरही कारवाई करा. अवैध उत्खनन होत असताना हे सर्व शांत राहतात. मग त्यांच्यावरही मोक्का लावा, अशी मागणी आंधळकर यांनी केली. वाळूचे ठेके जात नसल्याचा आरोप केला जाते. त्यापेक्षा वाळूचे रेशनिंग करा. स्वत:च्या नियंत्रणात वाळूची विक्री करावी. जिथे वाळू आहे तिथे वाहतूकदारांना जी किंमत आहे त्या किमतीने द्यावी. त्याची रॉयल्टी भरून घ्या, राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल, असे ते म्हणाले. 


भापकरांचाआरोप - चोर सोडून संन्याशाला फाशी 
भापकरांनीआमच्या आंदोलनाला उलटा चोर कोतवाल को डाटे, असे म्हटले. मात्र, त्यांचे वक्तव्य म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ असेच आहे. महसूल विभागाकडून वाळू वाहतूकदारांच्या गाड्या जप्त केल्या जातात. कन्नडमध्ये सहा गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. पंधरा दिवस त्या थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळे आमचे नुकसान होते. दंडात्मक कारवाई करावी, मात्र महसूलकडून गाड्या जप्त करून अन्याय होत असल्याचे ते म्हणाले. 


जागेवरच पैसा 
पैसेकोणा एका व्यक्तीला दिले जातात का? असे विचारले असता पोलिस निरीक्षकापासून सर्वांना हप्त्याचे पैसे जातात. जागेवरच पोलिस हे पैसे घेतात, असे आंधळकर म्हणाले. मात्र, हप्ते घेणारे हे अधिकारी कोण? असे विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला. 


तीन रस्त्यांवर लागतो हप्ता 
कन्नड -औरंगाबाद रस्त्यावर दोन लाख रुपये, तर फर्दापूर-औरंगाबाद लाख ८० हजार, तर जालना-चोपडा -औरंगाबाद रस्त्यावर दीड लाख रुपये हप्ता एका वाळू वाहतूकदाराला द्यावा लागतो. महिन्याकाठी प्रत्येक वाळू वाहतूकदाराला दोन लाख याप्रमाणे २०० वाहतूकदारांना चार कोटी रुपयांचा हप्ता द्यावा लागत आहे. केवळ पोलिस त्रास देत असल्यामुळे पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना औरंगाबाद वाळू वाहतूकदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अश्फाक पटेल यांनी होकार दिला. 


तज्ञ सांगतात : वाळू उपसा हेच पाणी समस्येचे मूळ 
वाळूमुळेनदीपात्रात पाणी ओलावा निर्माण होतो. हेच पाणी जमिनीत झिरपून आणि मुरून भूजल साठे पुनरुज्जीवित करते. मात्र, वाळूअभावी पाणी झिरपण्याची प्रक्रिया थांबून जाते. अवैध वाळू उपसा हेच भूजल साठे खोल जाण्याचे प्रमुख कारण आहे, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पर्यावरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. सतीश पाटील यांनी सांगितले. 


आंधळकरांनी या वेळी अजबच सल्ला दिला. उजनी इतर प्रकल्पांत कोट्यवधी रुपयांचे गौणखनिज आहे. तेथील पर्यावरणाची अट दूर करून त्याची विक्री करावी म्हणजे राज्य एका वर्षात कर्जमुक्त होईल. उजनी धरणात जल आयोग नवी दिल्लीच्या सर्वेक्षणाप्रमाणे ५१ हजार कोटी रुपयांचे गौणखनिज साठले आहे. ते काढल्यास शासनाला महसूल मिळेल. तसेच गौणखनिज काढल्यामुळे पाणीसाठा वाढेल. त्यामुळे पर्यावरणाचे नियम सांगू नयेत, असा अजब सल्ला आंधळकरांनी दिला. 


पोलिस अधीक्षक आरती सिंहांची उत्तरे 
आरोप:
वाळूवाहतूकदारांना पोलिसांना दरमहा कोटी रुपयांचा हप्ता द्यावा लागतो. 
उत्तर: ग्रामीणभागात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात कारवाई केली जात आहे. त्यामुळेच असे आरोप केले जात आहे. त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आमच्याकडे द्यावेत. आम्ही संबंधितांवर कारवाई करू. 


आरोप: पोलिसदररोज वाळू वाहतूकदारांना त्रास देतात. 
उत्तर: अवैधवाळू वाहतूक केल्यास पोलिस त्यावर कारवाई करणारच. कारवाई झाल्यानंतर त्रास देणे म्हणणे चुकीचे आहे. 


आरोप: पोलिसनिरीक्षकापासून इतर अधिकाऱ्यांना जागेवरच पैसे द्यावे लागतात. 
उत्तर: त्यांनीआमच्याकडे येऊन पुरावे द्यावेत. संबंधितांवर कारवाई केली जाईल. सर्वच प्रामाणिक आहेत, असे आम्ही म्हणणार नाही. विभागीय आयुक्तांनी ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ असे जे म्हटले तशीच परिस्थिती आहे. मोर्चानंतरही अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात कारवाई केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...