आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ गायिका आंध्रलता डॉ.आशालता करलगीकर यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/पुणे- ज्येष्ठ व सुप्रसिद्ध गायिका डॉ.आशालता करलगीकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. काल (शुक्रवार) रात्री 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 75 वर्षांच्या होत्या. आज (शनिवार) सकाळी 11 वाजता प्रताप नगर येथील स्मशान भूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्‍यात येणार आहेत.

 

हैदराबाद येथे लहानपणीच उत्कृष्ट गायिका म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. पंडित नेहरू, इंदिरा गांधी, नीलम संजीव रेड्डी, लता मंगेशकर, मोहमद रफी आदी मान्यवरांसमोर त्यांनी आपली कला सादर केली व प्रशंसा मिळविली. 1963 साली अफगानिस्तान मधील काबूल येथे पं.भीमसेन जोशी, पं.सामताप्रसाद, ज्येष्ठ नृत्यांगना इंद्राणी रहमान अशा नामांकित कलाकारांबरोबर त्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला.

त्यांच्या सांगितिक कर्तुत्वामुळे त्यांना मा.माजी राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी 'आंध्रलता' हा किताब देऊन गौरविले होते.

 

एलआयसीमधून सेवानिवृत्त झालेल्या आशाताईंना सूरममी, सुरश्री असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते. अतिशय नम्र, लाघवी व अभ्यासू गायिका गमावल्याने औरंगाबादच्या कलाविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पती श्री. वसंतराव करलगीकर, मुलगा निषाद, सून विद्या, मुलगी कविता, जावई किशन वतनी व नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...